कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (Gokul) गाय आणि म्हैशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या ग्राहकांना जादा दराने दूध खरेदी करावी लागणार आहे.आजपासून मुंबई आणि पुण्यात प्रतिलिटर म्हैस दुधाचा दर 72 रुपयांवरून 74 रुपये; तर कोल्हापुरात हा दर 66 रुपयांवरून 68 रुपये होईल. मुंबई, पुण्यात गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 56 वरून 58 रुपये; तर कोल्हापुरात हा दर 48 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आला आहे. ‘गोकुळ’च्या दुधाला (Gokul Dudh Sangh) कोल्हापूरसह मुंबई, पुण्यात मोठी मागणी आहे.एकट्या मुंबईत ‘गोकुळ’ची आठ लाख लिटर दुधाची विक्री होते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘गोकुळ’ने जानेवारी महिन्यात दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. मात्र, विक्री दरात वाढ केली नव्हती. मध्यंतरी गायीच्या दूध खरेदी दरातही वाढ करण्यात आली होती. राज्यात अमुलसह मदर डेअरीने दूध विक्री दरात एक मेपासून प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे ‘गोकुळ’नेही दूध विक्री दरात वाढ केली आहे.म्हैस दूधशहरजुने दरनवे दरपुणे, मुंबई7274कोल्हापूर6668गाय दूधशहरजुने दरनवे दरपुणे, मुंबई5658कोल्हापूर4850हेही वाचामुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा मिडी एसी बसेस धावणार
विनायक सावरकरांचा दादरमधील बंगला पाडला जाण्याची शक्यता
‘गोकुळ’चे दूध महागले
