गोव्याची समृद्धीकडे वाटचाल : मंत्री सिक्वेरा

मडगाव : गोवा पद्धतशीर विकास आणि समृद्धीकडे वाटचाल करत आहे. सुजाण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी अथक प्रयत्न करत आहेत. डॉ. सावंत सरकारने साधलेला पायाभूत विकास खरोखरच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे असे उद्गार कायदा व न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी काढले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोवा मुक्ती दिन कार्यक्रमात मंत्री आलेक्स सिक्वेरा बोलत […]

गोव्याची समृद्धीकडे वाटचाल : मंत्री सिक्वेरा

मडगाव : गोवा पद्धतशीर विकास आणि समृद्धीकडे वाटचाल करत आहे. सुजाण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी अथक प्रयत्न करत आहेत. डॉ. सावंत सरकारने साधलेला पायाभूत विकास खरोखरच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे असे उद्गार कायदा व न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी काढले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोवा मुक्ती दिन कार्यक्रमात मंत्री आलेक्स सिक्वेरा बोलत होते. यावेळी त्यांच्याच हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. आपल्या भाषणात मंत्री श्री. सिक्वेरा म्हणाले की, गोव्याने 2014 पासून पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि सामाजिक उन्नती या क्षेत्रात प्रचंड विकास केला आहे. राज्य सरकारने बहुसंख्य सरकारी योजना आणि सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत जेणेकरून लोकांना कोणत्याही त्रासाशिवाय लाभ घेता येतो.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांनी मानवतेचे चांगले संस्कार ऊजवले पाहिजेत. निखळ समर्पण आणि चिकाटी विद्यार्थी समुदायाला त्यांच्या निवडलेल्या करिअरमधील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिक मजबूत करेल.या वेळी दक्षिण गोव्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मार्च पास्टमध्ये अवर लेडी ऑफ हेल्थ हायस्कूल, कुंकळळी यांनी प्रथम, जवाहर नेहरू विद्यालय, काणकोण यांनी द्वितीय तर फोंडा येथील आल्मेदा हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. सांस्कृतिक कार्यक्रमात श्र्रद्धानंद विद्यालय, काणकोण यांनी प्रथम, मडगावचे रवींद्र केळेकर ज्ञान मंदिरने द्वितीय तर दामोदर इंग्लिश हायस्कूल, मडगावने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी मतदार जागृती व मतदानाचे महत्त्व व मतदानाचा हक्क या विषयावर पथनाट्या सादर करण्यात आले. कार्यक्रमाला नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी खा. विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू, स्वातंत्र्यसैनिक, वरिष्ठ सरकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Go to Source