पर्पल फेस्त व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत गोवा संघाचा सहभाग
फोंडा : गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्त अंतर्गत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत गोवा संघाने सहभाग घेतला. पणजी येथील डॉन बॉस्को ओरेटरी कोर्टवर ही स्पर्धा खेळविण्यात आली. गोवा संघात गौरेश मराठे, स्टेनी डिसोझा, विशांत नागवेकर, मोयजेस रॉड्रिगीस, मौसिक सय्यद, शफी, रुकी अहमद, मेलवीन मेंडीस, मिथून शिरोडकर, मंगेश कुट्टीकर, संतोष गावस, चंद्रकांत गावडे, रितेश वायंगणकर व पॅट्रीक डिसोझा यांचा समावेश होता. प्रशिक्षक म्हणून गुणा सित्रुला, व्यवस्थापक रितेश वायंगणकर व पॅट्रीक डिसोझा तसेच फिजिओ म्हणून डॉ. प्रणव गावणेकर यांनी काम पाहिले. विशांत नागवेकर हे पर्पल फेस्तचे ‘ब्रँड अँम्बासेडर’ आहेत. गोवा संघाने पहिल्यांदाच व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेदरम्यान उपसभापती तथा म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा व थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी मैदानावर भेट देऊन गोवा संघाला शुभेच्छा दिल्या. गोवा संघाने दिल्ली, कर्नाटक व पु•tचेरी या संघाविरुद्ध खेळून उत्तम प्रदर्शन केले.
Home महत्वाची बातमी पर्पल फेस्त व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत गोवा संघाचा सहभाग
पर्पल फेस्त व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत गोवा संघाचा सहभाग
फोंडा : गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्त अंतर्गत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत गोवा संघाने सहभाग घेतला. पणजी येथील डॉन बॉस्को ओरेटरी कोर्टवर ही स्पर्धा खेळविण्यात आली. गोवा संघात गौरेश मराठे, स्टेनी डिसोझा, विशांत नागवेकर, मोयजेस रॉड्रिगीस, मौसिक सय्यद, शफी, रुकी अहमद, मेलवीन मेंडीस, मिथून शिरोडकर, मंगेश कुट्टीकर, संतोष गावस, चंद्रकांत गावडे, […]