गोव्यात गेल्या पाच वर्षांनंतर रेबीजमुळे पहिल्या मृत्यूची नोंद

पणजी : राज्यात रेबीजमुळे गेल्या पाच वर्षांनंतर काल सोमवारी पहिल्या मृत्यूची नोंद झाली असून आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये या व्यक्तीला कुत्रा चावला होता. तेव्हापासून ती व्यक्ती रेबीजसाठी पॉझिटिव्ह ठरली होती आणि तिच्यावर उपचार सुरु होते. ही व्यक्ती उत्तर गोव्यातील असून सोमवारी तिचा मृत्यू झाल्याने गेल्या पाच वर्षांच्या कालावधीतील रेबीजचा हा पहिला बळी ठरला आहे. राज्यात दिवसेंदिवस […]

गोव्यात गेल्या पाच वर्षांनंतर रेबीजमुळे पहिल्या मृत्यूची नोंद

पणजी : राज्यात रेबीजमुळे गेल्या पाच वर्षांनंतर काल सोमवारी पहिल्या मृत्यूची नोंद झाली असून आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये या व्यक्तीला कुत्रा चावला होता. तेव्हापासून ती व्यक्ती रेबीजसाठी पॉझिटिव्ह ठरली होती आणि तिच्यावर उपचार सुरु होते. ही व्यक्ती उत्तर गोव्यातील असून सोमवारी तिचा मृत्यू झाल्याने गेल्या पाच वर्षांच्या कालावधीतील रेबीजचा हा पहिला बळी ठरला आहे. राज्यात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारद्वारे आवश्यक ते प्रयत्न देखील करण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत रेबीज पॉझिटिव्ह होण्याच्या घटना बंद झाल्या होत्या. परंतु सप्टेंबर 2023 मध्ये उत्तर गोव्यातील ही व्यक्ती रेबीज पॉझिटिव्ह ठरली होती.