नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज..!

देशी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी, किनारी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात प्रतिनिधी/ पणजी सरत्या वर्षाला गुडबाय करून नव्या वर्षाच्या (2024) स्वागतासाठी गोवा सज्ज झाला आहे. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अफाट गर्दी दिसू लागली आहे. किनारी भागातील हॉटेल्स पर्यटकांनी फुल्ल झाली आहेत. यंदा  विदेशी पर्यटक कमी आहेत. मात्र देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात आले आहेत. गोवा हे जागतिक स्तरावरील पर्यटकांसाठी […]

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज..!

देशी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी, किनारी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात
प्रतिनिधी/ पणजी
सरत्या वर्षाला गुडबाय करून नव्या वर्षाच्या (2024) स्वागतासाठी गोवा सज्ज झाला आहे. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अफाट गर्दी दिसू लागली आहे. किनारी भागातील हॉटेल्स पर्यटकांनी फुल्ल झाली आहेत. यंदा  विदेशी पर्यटक कमी आहेत. मात्र देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात आले आहेत. गोवा हे जागतिक स्तरावरील पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असल्याने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यात येणे पसंत करतात.
या हंगामात हॉटेल्समध्ये 90 टक्क्यांहून अधिक पर्यटक दिसून आले आहेत आणि 31 डिसेंबरला हॉटेल्स फुल्ल असतील, असे राज्य पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नवीन वर्षाच्या उत्सवासाठी गोवा हे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे, असे ते म्हणाले. पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन गोवा पोलिसांनी सुट्टीच्या पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांची विक्री आणि सेवन प्रकारांच्या तपासणीसाठी स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक तज्ञांची विशेष पथके तयार केली आहेत.
किनारी भागाला जत्रेचे स्वरूप
किनारी भागात ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसत असून हॉटेल्स फुल्ल झाली आहेत खास कऊन कळंगुट, कांदोळी, बागातील परिसरात पर्यटकांची अफाट गर्दी पाहून एखाद्या जत्रेचे स्वऊप आल्यासारखे वाटते. काही हॉटेल व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी विदेशी पर्यटकांची संख्या बरीच कमी असून देशी पर्यटक जास्त प्रमाणावर दाखल झाले आहेत. वाढलेली गर्दी लक्षात घेऊन काही हॉटेल्सवाल्यांनी हॉटेलच्या खोलीचे भाव दुपटीने वाढविले आहेत. गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी बहुतेक हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. विदेशी पर्यटक कमी प्रमाणावर असून श्रीलंकेतून जास्त पर्यटक आले आहेत. अखेरच्या क्षणी होणारा त्रास कमी करण्यासाठी बहुतेक पर्यटकांनी आगावू नोंदणी केली आहे. या वर्षी देशी पर्यटक जास्त आहेत.
डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त पर्यटक गोव्यात येत असतात. पर्यटक किनारी भागाला जास्त पसंती देत असतात. संध्याकाळनंतर किनाऱ्यावर तर पर्यटकांची गर्दी जास्त असते. येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र  कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
‘संगीत रजनी’ कार्यक्रमांचे आयोजन
नवीन वर्ष साजरे करण्यासाठी किनारी भागातील व्यावसायिकांतर्फे विविध प्रकारच्या संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षणात भर घालण्यासाठी नामवंत कलाकारांनाही पाचारण करण्यात आले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक अशा सवलतीसुद्धा जाहीर करण्यात आल्या
आहेत. कळंगुट किनारी भागात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन अवजड वाहनांना आत किनाऱ्याच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नसून बाहेर पार्किंगची सोय करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
पर्यटकांच्या अडचणी दूर करण्यास, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसोबत नियोजनाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.