दिल्ली मद्य घोटाळ्याचे गोवा कनेक्शन

गोव्यातही चौकशी सुरु, अनेकांचे धाबे दणाणले : घोटाळ्याती ऊ. 45 कोटींचा गोव्यात वापर,ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली माहिती पणजी : दिल्लीतील मद्य घोटाळ्यातून मिळालेल्या रकमेचा काही भाग गोव्यातील निवडणुकीत वापरण्यात आल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील न्यायालयात सुनावणी करताना दिली. त्यामुळे त्या घोटाळ्याचा गोवा राज्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने […]

दिल्ली मद्य घोटाळ्याचे गोवा कनेक्शन

गोव्यातही चौकशी सुरु, अनेकांचे धाबे दणाणले : घोटाळ्याती ऊ. 45 कोटींचा गोव्यात वापर,ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली माहिती
पणजी : दिल्लीतील मद्य घोटाळ्यातून मिळालेल्या रकमेचा काही भाग गोव्यातील निवडणुकीत वापरण्यात आल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील न्यायालयात सुनावणी करताना दिली. त्यामुळे त्या घोटाळ्याचा गोवा राज्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर वरील माहिती उघड झाली आहे. या दारु घोटाळ्dयातून मिळालेल्या एकूण रक्कमेपैकी ऊ. 45 कोटी गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या खर्चासाठी पाठवण्यात आल्याची माहिती ईडीतर्फे न्यायालयात देण्यात आली असून त्याचा आधार घेऊन गोव्यातही चौकशी सुऊ झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दिल्ली सरकारने मद्यासाठी उत्पादन शुल्क धोरण आखले आणि ते राबवले. त्यातून मिळालेल्या सुमारे ऊ. 100 कोटीपैकी ऊ. 45 कोटी एवढी रक्कम आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापरले असा दावा ईडीतर्फे न्यायालयासमोर करण्यात आला आहे. ‘आप’च्या सर्वेक्षण पथकातील काही कार्यकर्त्यांनी ऊ. 70 लाखाची रक्कम रोख स्वऊपात दिली होती. प्रचार करणाऱ्या काही जणांना ती रक्कम देण्यात येत होती अशी माहिती ‘आप’चे प्रवक्ते विजय नायर यांनी ईडीला दिल्याचे समोर आले आहे. कथित मद्य घोटाळ्dयातील काही रक्कम पंजाब विधानसभा निवडणुकीतील खर्चासाठी पाठवली होती, असेही ईडीच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.
चार मार्गाने गोव्यात पोहोचली रक्कम
‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना रिमांड घेण्यासाठी काल शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा झालेल्या सुनावणीच्या वेळी वरील संपूर्ण तपशील उघड झाला आहे. ईडीतर्फे त्यांच्या वकिलांनी वरील माहिती न्यायालयासमोर दिल्याचे सांगण्यात आले. गोव्यातील 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ करीता ऊ. 45 कोटी पाठवण्यात आले आणि ती रक्कम वापरली गेली. ती रक्कम 4 विविध मार्गांनी गोव्यात नेण्यात आली. त्याची पुष्टी करण्याचे काम आता ईडीने हाती घेतले आहे. गोव्यातील ‘आप’च्या उमेदवारांनी त्या माहितीस दुजोरा दिल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
‘आप’च्या गोव्यातील उमेदवारांची होणार चौकशी
गोव्यासाठी नेमकी किती रक्कम पाठवण्यात आली याची चौकशी आता ईडीने सुऊ केली असून त्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. ईडीच्या माहितीनुसार गोव्यात ऊ. 45 कोटी पाठवले एवढी नोंद न्यायालयासमोर झालेली आहे. आता गोव्यातील 2022 मधील ‘आप’चे उमेदवार आणि विजयी आमदार यांची चौकशी ईडीतर्फे होणार असल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली आहे. दिल्लीचे मद्य धोरण आणि त्यातील घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी यांनी सुनावणीवेळी त्यांच्या सर्व समन्सना उत्तरे दिली. केजरीवाल यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही असा दावा केला. केजरीवाल यांना ईडीतर्फे अनेक समन्स पाठवण्यात आले आणि ते सर्व त्यांनी फेटाळले. म्हणून शेवटी ईडीने त्यांना गुरुवारी रात्री अटक केली आणि शुक्रवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी गोव्यातील मागील विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्षाने कोट्यावधी रक्कम खर्च केल्याचे सत्य त्यामुळे उघडकीस आले आहे. ती रक्कम नेमकी कोणाला दिली, कोणाकडून मिळाली, त्याचा वापर नेमका कशासाठी झाला? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची उत्तरे चौकशीतून मिळायची आहेत.