गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचा वीज दरवाढीस आक्षेप
उद्योगांवर परिणाम होणार असल्याची चिंता
पणजी : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या राज्यातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख संघटनेने वीज दरवाढीस आक्षेप घेतला असून त्याचे विपरित परिणाम उद्योगांवर होणार असल्याने चिंता व्यक्त केली आहे. तसेच विजेचा दर्जा आणि पुरवठा यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. वीज दरवाढीसंदर्भात चेंबरने एक पत्रक जारी केले असून गोव्यातील लहान मोठ्या उद्योगांसाठी वीज दरवाढ आव्हानात्मक ठरणार आहे. इतर राज्यात असलेल्या उद्योगांशी स्पर्धा वाढणार असून त्याचा परिणाम उद्योगांच्या सक्षमतेवर होण्याचा धोका आहे. इतर काही राज्यात उद्योगांचे वीजदर कमी आहेत. वीज दरातील तफावतीचा परिणामही उद्योगातील उत्पादनांवर होऊ शकतो, अशी शंका चेंबरने व्यक्त केली आहे.
त्या सूचनांचा विचार करण्याची गरज
वीज दरवाढीसाठी संयुक्त वीज नियमन आयोगाने घेतलेल्या सुनावणीत चेंबरने महसूल वाढीसाठी अनेक सूचना केल्या होत्या. त्यांच्यावर विचारच झाला नाही. वीज दरवाढीचा बोजा ग्राहक व उद्योगांवर टाकण्याऐवजी त्या सूचनांचा विचार करण्याची गरज होती, असेही चेंबरने म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचा वीज दरवाढीस आक्षेप
गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचा वीज दरवाढीस आक्षेप
उद्योगांवर परिणाम होणार असल्याची चिंता पणजी : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या राज्यातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख संघटनेने वीज दरवाढीस आक्षेप घेतला असून त्याचे विपरित परिणाम उद्योगांवर होणार असल्याने चिंता व्यक्त केली आहे. तसेच विजेचा दर्जा आणि पुरवठा यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. वीज दरवाढीसंदर्भात चेंबरने एक पत्रक जारी केले असून गोव्यातील लहान मोठ्या उद्योगांसाठी वीज दरवाढ […]