जावे नोकरीच्या शोधा…

नुसती पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांपुढे नोकरीचा प्रश्न नेहमीच सतावत असतो. पदवीनंतर कोणत्या कंपनीमध्ये नोकरी शोधायची याच्या विचारात आजचे तरुण इथे-तिथे भरकटत असताना दिसून येतात. पदवीनंतर आपल्या योग्यतेप्रमाणे नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण तसे कमीच पाहायला मिळते. यांना आपण काय बनायचं आहे, याबाबतच प्रश्न पडलेला असतो. शिवाय अनेकांना भविष्यातील नोकरीच्या संधांबाबत जास्त करून माहितीही करून […]

जावे नोकरीच्या शोधा…

नुसती पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांपुढे नोकरीचा प्रश्न नेहमीच सतावत असतो. पदवीनंतर कोणत्या कंपनीमध्ये नोकरी शोधायची याच्या विचारात आजचे तरुण इथे-तिथे भरकटत असताना दिसून येतात. पदवीनंतर आपल्या योग्यतेप्रमाणे नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण तसे कमीच पाहायला मिळते. यांना आपण काय बनायचं आहे, याबाबतच प्रश्न पडलेला असतो. शिवाय अनेकांना भविष्यातील नोकरीच्या संधांबाबत जास्त करून माहितीही करून घेण्याची इच्छा नसते.
ही उदासीनता बाजूला ठेवून आजच्या पदवीधर किंवा भविष्यात होऊ पाहणाऱ्या पदवीधरांनी भविष्यकालीन संधींचा आढावा घेण्यासाठी इंटरनेटसह विविध पर्यायी माध्यमांवर शोध घ्यायला हवा. त्यादृष्टीने पाहता यंदा म्हणजेच 2024 मध्ये भरतीचे प्रमाण 19 टक्के राहणार आहे, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2023 च्या तुलनेमध्ये 3 टक्के भरतीचे प्रमाण यंदा वाढणार आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास निर्मिती प्रकल्प
(मॅन्युफॅक्चरिंग), इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि अभियांत्रिकी कंपन्या त्याचप्रमाणे इतर सेवा देणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उमेदवारांची भरती मोठ्या प्रमाणात केली आहे.
दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांची मागणी मात्र काहीशी कमी राहिल्याचे दिसून आले आहे. यंदा अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिक वाहन कंपन्या आपली कामगिरी अधिक सरस करू शकतात. तेव्हा या क्षेत्रामध्ये 25 ते 30 टक्के जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यापैकी काही कंपन्यांनी तर दुप्पट वेतनवाढीचे धोरणही राबविण्याचे ठरविलेआहे.
आताच्या घडीला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्स हे क्षेत्र कमालीचे नाव कमावू लागले आहे. या क्षेत्रामध्ये संधी अधिक असणार असून क्षेत्रातील उमेदवारांना 8 ते 12 टक्के वेतनवाढही मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.
अभियांत्रिकीचा विचार करता ऑटोमोबाईल, एरोस्पेस आणि डिफेन्स, केमिकल, कृषी आणि खाद्य प्रक्रिया उत्पादने, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यासह औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी नक्कीच शोधता येतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा यावर्षी 25 ते 30 टक्के भरतीचे प्रमाण राहणार आहे.
यातील कार्यरत कंपन्यांमध्ये उमेदवार घेण्यावरून स्पर्धा रंगणार असून या अंतर्गत 15 ते 40 टक्के उमेदवार एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी उडी घेताना दिसतील. इलेक्ट्रिक वाहन आणि अभियांत्रिकी कंपन्या मात्र दोन अंकी वेतनवाढीचे धोरण यंदा राबवतील, असे म्हटले जात आहे. तेव्हा या क्षेत्रात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी आहे त्या कंपनीतच स्थित असणं त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी अधिक असणार असून याठिकाणी 8 ते 12 टक्के वेतनवाढीची संधी असणार आहे. यासोबत वित्त आणि अकाऊंटींग, मनुष्यबळ विकास विभाग, कायदेशीर सल्लागार, विक्री आणि विपणन या क्षेत्रामध्येसुद्धा रोजगार उपलब्ध होतील. बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक
पॉवर ट्रेन आणि वाहनांच्या डिझाईन संबंधित ज्ञान असणाऱ्या अभियंत्यांना रोजगाराच्या संधी खुणावतील हे नक्की!