गो फॅशन 150 हून अधिक नवी स्टोअर्स उघडणार

देशभरात कंपनीची 414 स्टोअर्स कार्यरत वृत्तसंस्था / नवी दिल्ली महिलांच्या वस्त्रप्रावणांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या गो फॅशनने भारतामध्ये 150 हून अधिक नवी स्टोअर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गो कलर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गो फॅशनने येणाऱ्या काळामध्ये 120 ते 150 इतक्या स्टोअर्सची सुरुवात आर्थिक वर्ष 2025 पर्यंत करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यायोगे कंपनी एकंदर […]

गो फॅशन 150 हून अधिक नवी स्टोअर्स उघडणार

देशभरात कंपनीची 414 स्टोअर्स कार्यरत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महिलांच्या वस्त्रप्रावणांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या गो फॅशनने भारतामध्ये 150 हून अधिक नवी स्टोअर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गो कलर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गो फॅशनने येणाऱ्या काळामध्ये 120 ते 150 इतक्या स्टोअर्सची सुरुवात आर्थिक वर्ष 2025 पर्यंत करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यायोगे कंपनी एकंदर आपल्या व्यवसायाचा विस्तार सर्वदूर करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे.
मागच्या आर्थिक वर्षात कंपनीने जवळपास 94 स्टोअर्स सुरू केली आहेत. कंपनीची जवळपास 414 स्टोअर्स देशभरामध्ये कार्यरत आहेत. कंपनीचे सीईओ गौतम सरोगी हे आहेत. कंपनीने प्रत्यक्षात शोरूममार्फत विक्रीसोबतच ऑनलाईन विक्रीचीही सोय केली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस असल्याचे सीईओ सरोगी यांनी व्यक्त केला आहे.
कंपनीचा नफा जाहीर
जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत कंपनीने 13 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे सांगितले जाते. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 14 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने कमावला होता. 31 मार्च 2024 ला संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये कंपनीने कर पश्चात 82 कोटी रुपये नफ्याच्या माध्यमातून कमावले आहेत.