रामनाथी येथे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे आयोजन

जगातील 1 हजारपेक्षा अधिक हिंदूत्ववादी संघटनांचा सहभाग पणजी : गोव्यात येत्या 24 ते 30 जून या दरम्यान वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव तथा 12 वे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन श्रीरामनाथ देवस्थान, रामनाथी येथे आयोजित करण्यात येणार आहे. हिंदू जनजागरण समितीने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या या अधिवेशनात 25 राज्यातील 1 हजारपेक्षा अधिक हिंदूत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत. […]

रामनाथी येथे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे आयोजन

जगातील 1 हजारपेक्षा अधिक हिंदूत्ववादी संघटनांचा सहभाग
पणजी : गोव्यात येत्या 24 ते 30 जून या दरम्यान वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव तथा 12 वे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन श्रीरामनाथ देवस्थान, रामनाथी येथे आयोजित करण्यात येणार आहे. हिंदू जनजागरण समितीने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या या अधिवेशनात 25 राज्यातील 1 हजारपेक्षा अधिक हिंदूत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत. गेली 11 वर्षे हे संमेलन गोव्यात झालेले आहे. यंदाचे संमेलन हे 12 म्हणजे द्वादश संमेलन असून त्याची तयारी जोरदारपणे सुरु आहे. भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी संमेलनात व्यापक प्रयत्नांची दिशा ठरविली जाणार आहे. सनातन धर्माच्या सुरक्षेसाठी वैचारिक स्तरावर प्रयत्न करणे, मंदिरांच्या सुरक्षा, मंदिरांना सरकारच्या ताब्यातून बाहेर काढणे, वाढता जिहादी आतंकवाद वगैरे, भारतविरोधी संघटनांना तोंड देण्यासाठी स्वत:ची फळी मजबूत करणे व व्यापक पद्धतीने जनजागृती करणे असे या अधिवेशनाचे स्वऊप आहे. देशातील असंख्य बुद्धिमान मंडळी या अधिवेशनात आपले विचार मांडणार आहेत. या संमेलनाचे निमंत्रक आहेत डॉ. चाऊदत्त पिंगळे. दि. 24 ते 26 जून पर्यंत हिंदू राष्ट्र अधिवेशन होईल. दि. 27 जून रोजी हिंदू विचार मंथन महोत्सव होईल.  दि. 28 जून रोजी मंदिर संस्कृती परिषद होईल. दि. 29 व 30 जून रोजी अधिवक्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.