नदाफ पिंजार समाजाला न्याय द्या

संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी  बेळगाव : राज्यामध्ये नदाफ पिंजार समाजाची जवळपास 22 ते 25 लाख लोकसंख्या आहे. सदर समाज सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीयरित्या मागास आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने विशेष अनुदान द्यावे, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य नदाफ पिंजार समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुस्लीम धर्मामध्ये येणारा हा अल्पसंख्याक समाज असून, अत्यंत मागास आहे. या समाजाला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या […]

नदाफ पिंजार समाजाला न्याय द्या

संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी 
बेळगाव : राज्यामध्ये नदाफ पिंजार समाजाची जवळपास 22 ते 25 लाख लोकसंख्या आहे. सदर समाज सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीयरित्या मागास आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने विशेष अनुदान द्यावे, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य नदाफ पिंजार समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुस्लीम धर्मामध्ये येणारा हा अल्पसंख्याक समाज असून, अत्यंत मागास आहे. या समाजाला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समाजाला न्याय मिळावा यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन केले जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पिंजार नदाफ या समाजासह इतर 13 जातींच्या विकासासाठी सरकारकडे यापूर्वीही पाठपुरावा केला आहे. यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. राज्याने सत्तेत येण्यापूर्वी सर्वांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यासाठी पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.