अंजलीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या
कोळी-अंबिगेर समाजातर्फे जोरदार निदर्शने
बेळगाव : हुबळी येथे अंजली अंबिगेर या युवतीची हत्या करण्यात आली. या हत्याकांडातून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी बेळगाव जिल्हा कोळी समाज व अंबिगेर समाजाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. चन्नम्मा चौक येथे साखळी आंदोलन करून सरकारने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. अंजलीच्या मारेकऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पोलिसांकडे तोंडी तक्रार करूनदेखील पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अंजलीचा खून झाला. काही दिवसांपूर्वीच नेहा हिरेमठ हिचीही हत्या झाली होती. यामुळे संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचवेळी नेहाच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा दिली असती तर अंजलीचा जीव गेला नसता, अशी प्रतिक्रिया राज्यसभा सदस्य साबण्णा तळवार यांनी व्यक्त केली. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार युवतींचे खून होत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला आहे. अंजलीच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा देऊन तिच्या कुटुंबीयाला सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी उपमहापौर व असोसिएशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा राजश्री पुजारी यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कोळी समाजाने आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, सरचिटणीस संजय पाटील, शहराध्यक्ष सिद्दणगौडा सुणगार, युवक अध्यक्ष अप्पय्या रामराव, गीता कोळी यासह इतर उपस्थित होते. आंदोलनावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी अंजलीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या
अंजलीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या
कोळी-अंबिगेर समाजातर्फे जोरदार निदर्शने बेळगाव : हुबळी येथे अंजली अंबिगेर या युवतीची हत्या करण्यात आली. या हत्याकांडातून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी बेळगाव जिल्हा कोळी समाज व अंबिगेर समाजाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. चन्नम्मा चौक येथे साखळी आंदोलन करून सरकारने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. अंजलीच्या मारेकऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी […]