डी मार्ट मधील बुरशीजन्य बिस्किटे खाऊन मुलींना विषबाधा; मनसे पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब

कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापुरातील डी मार्ट मधील बुरशी आलेली कराची कंपनीची बिस्किटे खाऊन छोट्या मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट वरती धडक मोहीम राबवली आहे. कराची नावाच्या कंपनीची बिस्किटे व काजू कतलीला बुरशी चाललेली असताना डी मार्ट मधून त्याची विक्री केली जात होती. यातूनच मुलींना विषबाधा झाली […]

डी मार्ट मधील बुरशीजन्य बिस्किटे खाऊन मुलींना विषबाधा; मनसे पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब

कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरातील डी मार्ट मधील बुरशी आलेली कराची कंपनीची बिस्किटे खाऊन छोट्या मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट वरती धडक मोहीम राबवली आहे.
कराची नावाच्या कंपनीची बिस्किटे व काजू कतलीला बुरशी चाललेली असताना डी मार्ट मधून त्याची विक्री केली जात होती. यातूनच मुलींना विषबाधा झाली हे समजताच मनसे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी स्टोअर मॅनेजर अजिंक्य थोरात याला दाखवून मनसे स्टाईलने धडा शिकवला. अन्न औषध प्रशासन आयुक्त तुषार शिंगाडे वं निरीक्षक गणेश कदम यांना डी मार्ट मध्ये बोलावून घेऊन बुरशी चढलेली सर्व बिस्किटे , काजुकतली , मशरूम व अन्य बुरशीजन्य पदार्थ सील करावयास लावून त्याचा पंचनामा करून मनसे पदाधिकाऱ्यांच्या पंचनाम्यावर स्वाक्षरी घेण्यास भाग पाडले . तसेच अन्न औषध प्रशासना कडून बुरशीजन्य पदार्थ सील करण्यात आले. कार्यालयीन सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर डी मार्ट वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.