जॉर्जिया-झेक सामना बरोबरीत

वृत्तसंस्था/ हॅमबूर्ग 2024 च्या युरो चषक चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात जॉर्जियाने झेक प्रजासत्ताकला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. या प्रमुख स्पर्धेमध्ये जॉर्जियाने पहिल्यांदाच गुण मिळविला आहे. 2024 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत जॉर्जियाचा संघ प्रथमच आपला सहभाग दर्शवित आहे. या सामन्यात जॉर्जियाचे खाते जॉर्जेस मिकाटेझीने उघडले. त्यानंतर पॅट्रिक स्किहेकने हेडरद्वारे गोल […]

जॉर्जिया-झेक सामना बरोबरीत

वृत्तसंस्था/ हॅमबूर्ग
2024 च्या युरो चषक चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात जॉर्जियाने झेक प्रजासत्ताकला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. या प्रमुख स्पर्धेमध्ये जॉर्जियाने पहिल्यांदाच गुण मिळविला आहे.
2024 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत जॉर्जियाचा संघ प्रथमच आपला सहभाग दर्शवित आहे. या सामन्यात जॉर्जियाचे खाते जॉर्जेस मिकाटेझीने उघडले. त्यानंतर पॅट्रिक स्किहेकने हेडरद्वारे गोल नोंदवून झेक प्रजासत्ताकला बरोबरी साधून दिली. आता फ गटातील होणाऱ्या शेवटच्या सामन्यात जॉर्जिया आणि झेक प्रजासत्ताक यांना बाद फेरीत प्रवेश मिळविण्याकरीता आपल्या पुढील लढतीत विजयाची नितांत गरज आहे. फ गटात तुर्की आणि पोर्तुगाल यांचाही समावेश आहे.