गाझापट्टी पुन्हा हादरली, 101 ठार

इस्रायलचा पॅलेस्टिनींवर हवाई हल्ला, निर्वासित शिबिर उद्ध्वस्त, 200 हून अधिक जखमी वृत्तसंस्था/ गाझासिटी इस्रायलने निष्पाप पॅलेस्टिनींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवत शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला. गाझामधील विविध भागात इस्त्रायली हल्ल्यात किमान 101 पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला, तर 200 हून अधिक जण जखमी झाले. इस्रायली सैन्याने गाझाच्या सर्वात जुन्या निर्वासित शिबिरावर रविवारी सर्वात मोठा […]

गाझापट्टी पुन्हा हादरली, 101 ठार

इस्रायलचा पॅलेस्टिनींवर हवाई हल्ला, निर्वासित शिबिर उद्ध्वस्त, 200 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था/ गाझासिटी
इस्रायलने निष्पाप पॅलेस्टिनींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवत शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला. गाझामधील विविध भागात इस्त्रायली हल्ल्यात किमान 101 पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला, तर 200 हून अधिक जण जखमी झाले. इस्रायली सैन्याने गाझाच्या सर्वात जुन्या निर्वासित शिबिरावर रविवारी सर्वात मोठा प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये अनेक निर्वासितांच्या छावण्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. गाझा सिव्हिल डिफेन्सनुसार, मृतांमध्ये प्रामुख्याने महिला आणि मुलांचा समावेश आहे.
इस्रायली सैन्याने अल तुफाह पॅम्पवर दुसरा मोठा हल्ला केला. यामध्ये 18 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. त्याचवेळी इजिप्त आणि गाझा सीमेवर असलेल्या रफाहच्या शरणार्थी शिबिरावर इस्रायली लष्कराने बॉम्बही टाकले.  या हल्ल्यांचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये लोक जखमी आणि मृतांना ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसत आहेत.
गेल्या वषी 7 ऑक्टोबरपासून गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या लष्करी कारवाईत आतापर्यंत 37 हजारहून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 85 हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, हमासच्या कैदेतून ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायल सरकारवर दबाव वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत ओलिसांचे नातेवाईक तेल अवीवमध्ये सातत्याने निदर्शने करत आहेत.