गौतमी पाटीलच नवीन सॉंग दिसला ग बाई दिसला प्रेक्षकांच्या भेटीला
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमी चर्चेत असते. तिचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर सुद्धा दिसत आहे. गाण्याचे बोल आहे दिसला ग बाई दिसला. हे गाणं पिंजरा चित्रपटातल्या गाण्याचं रिमेक आहे.
View this post on Instagram
A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)
या गाण्यातून गौतमीने आपल्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. या व्हिडीओ मध्ये तिचा वेगळा अंदाज दिसत आहे. तिला साथ देण्यासाठी गाण्यात ललित प्रभाकर देखील आहे. यामुळे हे गाणं अधिकच भावलं आहे. हे गाणं प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटाचे आहे. या गाण्यात गौतमीची धमाकेदार अदाकारी पाहायला मिळत आहे.
ALSO READ: लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, ३ जण गंभीर जखमी
हे गाणं 1972 च्या सदाबहार चित्रपट पिंजरा चित्रपटातील दिसला गं बाई दिसला या गाण्याचं रिमेक आहे. या गाण्याचा रिमेक पाहून नेटकऱ्यांना निराशा झाली असून या गाण्यासाठी ट्रोलिंग होत आहे. काहींनी या गाण्याचं कौतुक केलं असून काहींनी गाण्याची वाट लावली असे म्हटले आहे.
ALSO READ: ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन
नेटकरी या गाण्यावर आपापली प्रतिक्रिया देत आहे. सध्या गौतमीचे दिसला गं बाई दिसला गाणं ट्रेंडिंगवर आहे.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: बॉलिवूडनंतर प्राजक्ता कोळीने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, चित्रपटाचे पोस्टर रिलीज