खडेबाजार येथील दुकानातील गॅसस्फोटाने खळबळ

सुदैवाने मोठा अनर्थ टळला : दुकान खाक बेळगाव : सतत गजबजलेले ठिकाण म्हणून ओळखलेल्या खडेबाजार येथील सुपर सेल अॅण्ड सर्व्हिस या मिक्सर दुकानामध्ये गॅसस्फोट झाल्याने शुक्रवारी रात्री एकच खळबळ उडाली. आजूबाजूच्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ […]

खडेबाजार येथील दुकानातील गॅसस्फोटाने खळबळ

सुदैवाने मोठा अनर्थ टळला : दुकान खाक
बेळगाव : सतत गजबजलेले ठिकाण म्हणून ओळखलेल्या खडेबाजार येथील सुपर सेल अॅण्ड सर्व्हिस या मिक्सर दुकानामध्ये गॅसस्फोट झाल्याने शुक्रवारी रात्री एकच खळबळ उडाली. आजूबाजूच्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. खडेबाजार येथील शीतल हॉटेल तसेच पै इलेक्ट्रॉनिक्सच्या शेजारी असलेल्या दुकानामध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. या दुकानामध्ये सिलिंडर गॅस होते. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे लहान सिलिंडर गॅसचा स्फोट झाला. जवळपास 2 ते 3 वेळा या स्फोटाचा आवाज आला. यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली. तातडीने तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला.  काहीवेळातच अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. यावेळी सतर्कता म्हणून परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र त्या आगीमध्ये दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. यामध्ये नेमके किती नुकसान झाले, याचा आकडा रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही. याबाबत मार्केट पोलीस स्थानकामध्ये रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याचे काम सुरू होते.