गॅसची ईकेवायसी आता मोबाईलवर

वितरकांवरील कामाचा ताण कमी : ग्राहकांना सोयीस्कर बेळगाव : गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ईकेवायसीचे काम हाती घेण्यात आले आहे. आता गॅसची ईकेवायसी घर बसल्या मोबाईलवर करता येणार आहे. यासाठी एक नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गॅस एजन्सी आणि वितरकांवरील ईकेवायसीचा ताण काहीसा कमी होणार आहे. मागील काही महिन्यांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅससाठी ईकेवायसी […]

गॅसची ईकेवायसी आता मोबाईलवर

वितरकांवरील कामाचा ताण कमी : ग्राहकांना सोयीस्कर
बेळगाव : गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ईकेवायसीचे काम हाती घेण्यात आले आहे. आता गॅसची ईकेवायसी घर बसल्या मोबाईलवर करता येणार आहे. यासाठी एक नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गॅस एजन्सी आणि वितरकांवरील ईकेवायसीचा ताण काहीसा कमी होणार आहे. मागील काही महिन्यांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅससाठी ईकेवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात ईकेवायसीचे काम गॅस कंपन्यांकडे देण्यात आले होते. दरम्यान गॅस एजन्सींसमोर ईकेवायसीसाठी रांगा लागल्या होत्या. त्यानंतर ईकेवायसीची जबाबदारी गॅस वितरकांकडे सोपविण्यात आली. गॅस वितरणावेळी ईकेवायसी करावी, असा आदेश वितरकांना देण्यात आला. मात्र काहीवेळेला ग्राहक घरात नसणे आणि सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे या कामातही अडथळा निर्माण होवू लागला आहे. त्यामुळे गॅस ईकेवायसीचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र आता शासनाने गॅस ईकेवायसीसाठी मोबाईलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक स्वत:च्या मोबाईलवरून ईकेवायसी करू शकतात. गॅस कनेक्शनला बायोमेट्रिक ईकेवायसी प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण गॅस ग्राहकांची संख्या आणि वापरात येणाऱ्या ग्राहकांची संख्याही कळण्यास मदत होणार आहे. गॅस ईकेवायसी कामात अधिक सुलभता आणत ईकेवायसीचे काम आता मोबाईलवर सुरू झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी घर बसल्या मोबाईलवरून ईकेवायसी करणे शक्य आहे.