गारगाई धरण प्रकल्प निधीत 270 कोटींची वाढ

गेल्या 15 वर्षांपासून गारगाई धरण प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. मुंबईकरांची (mumbai) अतिरिक्त तहान भागवण्यासाठी गारगाई धरणाचा प्रस्ताव शासनाने तयार केला. मात्र  राजकीय विरोधानंतर हा प्रस्ताव थंडावला होता. मात्र आता मुंबई महापालिकेत (brihanmumbai municipal corporation) पुन्हा एकदा गारगाई धरण प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 3006 कोटी 75 लाख 27,009 इतकी होती. मात्र, आता या प्रकल्पाचा खर्च 3276 कोटी 75 लाख 90,934 इतका दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे गारगाई धरण (gargai dam) प्रकल्पाच्या खर्चात 270 कोटींनी वाढ (budget increase) झाली आहे. तसेच विविध करासह या प्रकल्पाची किंमत 5396 कोटी 43 लाख 95,810 इतकी दर्शवण्यात आली आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा,भातसा, तुळशी व विहार या सात धरणातून दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु, मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात मुंबईला 4,500 दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मागील 15 वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा आहे. मात्र, प्रथमच स्थायी समितीत या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. गारगाई धरण प्रकल्प हा 844 हेक्टर जागेवर होणार आहे. या धरण प्रकल्पात विविध प्रकारची एकूण 3 लाखाहून अधिक झाडे बाधित होणार आहेत. बाधित होणारी झाडे पाहता तेवढ्याच नवीन झाडांचे रोपण राज्यातील अन्य जिल्ह्यात केले जाणार असल्याने त्यासाठी जागा निश्चित होत आहे. गारगाई नदीवर 69 मीटर उंचीचे आणि 979.4 मीटर लांबीचे धरण बांधणे तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयदरम्यान 1.6 किमी लांबीचे जलवाहक बोगद्याचे बांधकाम यासह अन्य कामे केली जाणार आहेत. त्यासाठी एका कंपनीची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून एकूण तपशीलवार अंदाजित मूळ रक्कम 3 हजार 276 कोटी 75 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. 2020 मध्ये स्थायी समितीने दिलेल्या मंजुरीवेळी एकूण प्रकल्प खर्च 3006 कोटी 75 लाख रुपये होता. मात्र, या खर्चात आता वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध कर आणि अन्य कामासहित या प्रकल्पाची एकूण किंमत 5 हजार 396 कोटी 43 लाख रुपयापर्यंत गेली आहे. या धरण प्रकल्प कामात प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनही असून त्याची किंमत ही 450 ते 500 कोटी रुपये आहे. ती यामध्ये नमूद केलेली नाही. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प खर्च वाढणार आहे. गारगाई धरण बांधण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहे.हेही वाचा मुंबईत एलपीजी तुटवडा, हॉटेल्स बंद होण्याची शक्यता मुंबईत उष्णतेची लाट, IMD कडून यलो अलर्ट

गारगाई धरण प्रकल्प निधीत 270 कोटींची वाढ

गेल्या 15 वर्षांपासून गारगाई धरण प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. मुंबईकरांची (mumbai) अतिरिक्त तहान भागवण्यासाठी गारगाई धरणाचा प्रस्ताव शासनाने तयार केला. मात्र  राजकीय विरोधानंतर हा प्रस्ताव थंडावला होता. मात्र आता मुंबई महापालिकेत (brihanmumbai municipal corporation) पुन्हा एकदा गारगाई धरण प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 3006 कोटी 75 लाख 27,009 इतकी होती. मात्र, आता या प्रकल्पाचा खर्च 3276 कोटी 75 लाख 90,934 इतका दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे गारगाई धरण (gargai dam) प्रकल्पाच्या खर्चात 270 कोटींनी वाढ (budget increase) झाली आहे. तसेच विविध करासह या प्रकल्पाची किंमत 5396 कोटी 43 लाख 95,810 इतकी दर्शवण्यात आली आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा,भातसा, तुळशी व विहार या सात धरणातून दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु, मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात मुंबईला 4,500 दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मागील 15 वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा आहे. मात्र, प्रथमच स्थायी समितीत या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.गारगाई धरण प्रकल्प हा 844 हेक्टर जागेवर होणार आहे. या धरण प्रकल्पात विविध प्रकारची एकूण 3 लाखाहून अधिक झाडे बाधित होणार आहेत. बाधित होणारी झाडे पाहता तेवढ्याच नवीन झाडांचे रोपण राज्यातील अन्य जिल्ह्यात केले जाणार असल्याने त्यासाठी जागा निश्चित होत आहे. गारगाई नदीवर 69 मीटर उंचीचे आणि 979.4 मीटर लांबीचे धरण बांधणे तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयदरम्यान 1.6 किमी लांबीचे जलवाहक बोगद्याचे बांधकाम यासह अन्य कामे केली जाणार आहेत. त्यासाठी एका कंपनीची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून एकूण तपशीलवार अंदाजित मूळ रक्कम 3 हजार 276 कोटी 75 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. 2020 मध्ये स्थायी समितीने दिलेल्या मंजुरीवेळी एकूण प्रकल्प खर्च 3006 कोटी 75 लाख रुपये होता. मात्र, या खर्चात आता वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध कर आणि अन्य कामासहित या प्रकल्पाची एकूण किंमत 5 हजार 396 कोटी 43 लाख रुपयापर्यंत गेली आहे.या धरण प्रकल्प कामात प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनही असून त्याची किंमत ही 450 ते 500 कोटी रुपये आहे. ती यामध्ये नमूद केलेली नाही. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प खर्च वाढणार आहे. गारगाई धरण बांधण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहे.हेही वाचामुंबईत एलपीजी तुटवडा, हॉटेल्स बंद होण्याची शक्यतामुंबईत उष्णतेची लाट, IMD कडून यलो अलर्ट

Go to Source