हुतात्मा स्मारकासमोरच कचऱ्याचे ढीग

बेळगाव : शहरातील हुतात्मा चौक हे अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतीकारी स्थळ आहे. याचा वारसा जपणे हे आपले कर्तव्य असताना त्याच्या समोरच कचऱ्याचे ढीग टाकणे हे अत्यंत खेदजनक आहे. वास्तविक या परिसराची नित्यनेमाने स्वच्छता करून त्याचे पावित्र्य जपण्याची गरज असताना तेथे अस्वच्छताच दिसून येते. शहरातील कचरा उचलीचा प्रश्न हा नेहमीच त्रासदायक ठरला आहे. कचरागाडी फिरत असताना […]

हुतात्मा स्मारकासमोरच कचऱ्याचे ढीग

बेळगाव : शहरातील हुतात्मा चौक हे अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतीकारी स्थळ आहे. याचा वारसा जपणे हे आपले कर्तव्य असताना त्याच्या समोरच कचऱ्याचे ढीग टाकणे हे अत्यंत खेदजनक आहे. वास्तविक या परिसराची नित्यनेमाने स्वच्छता करून त्याचे पावित्र्य जपण्याची गरज असताना तेथे अस्वच्छताच दिसून येते. शहरातील कचरा उचलीचा प्रश्न हा नेहमीच त्रासदायक ठरला आहे. कचरागाडी फिरत असताना अद्याप नागरिक कचरा रस्त्यावरच टाकतात. या शिवाय गटारीत कचरा फेकण्याचे प्रमाण तर मर्यादेबाहेर गेले आहे. दरम्यान सफाई कर्मचारीसुद्धा कचऱ्याचे ढीग उपसून रस्त्यावरच टाकतात. जेव्हा कचरागाडी येईल तेव्हा कचऱ्याची उचल होईल, हे आता सर्वश्रुत आहे.
तथापि, हुतात्मा स्मारकासमोरच कचऱ्याचे ढीग टाकणे हे मात्र त्या जागेच्या पावित्र्याला धक्का पोहोचविणारे आहे. या स्मारकाचा इतिहास सर्वांना समजण्याची नितांत गरज आहे. तथापि, किमान हे ऐतिहासिक वारसा स्थळ आहे, एवढे तरी महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. निदान स्मारकासमोर तरी कचरा टाकू नका, अशी सूचना महानगरपालिका आयुक्त आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना करतील का? शिवाय सुजाण म्हणवून घेणाऱ्या नागरिकांनी सुद्धा या स्मारकासमोर कचरा टाकण्याचे प्रकार बंद करावेत, अशी अपेक्षा करावी का?