गणपती विशेष गाड्यांची घोषणा पण तासाभरातच रद्द

गणेशोत्सवात (ganesh festival) कोकणातील प्रवास सुरक्षित आणि वेगवान व्हावा, यासाठी गणपती विशेष 250 रेल्वे फेऱ्यांची (special trains) घोषणा केली जाते. यंदाच्या उत्सवासाठी मध्य रेल्वेने गणेशोत्सव विशेष रेल्वे वाहतुकीची घोषणा सोमवारी सायंकाळी पाच वाजता केली. अवघ्या तासाभरातच ही घोषणा मागे (order cancelled) घेण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावली आहे. घोषणा मागे घेण्याचे नेमके कारण मध्य रेल्वेकडून (central railway) स्पष्ट करण्यात आलेले नाही. ‘मध्य रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाडी 2025 भाग-एक’ असे विशेष रेल्वे गाड्या चालवण्यासाठी ‘कोचिंग नोटिफिकेशन क्रमांक 490/2025’ मध्य रेल्वे मुख्यालयाने सोमवारी जाहीर केले. नोटिफिकेशन जाहीर करताना तीन जुलै रोजी कोकण रेल्वे विशेष रेल्वेगाडी व्यवहार्यता पत्र आणि एक जुलै रेल्वे मंडळ मंजूरी पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. गणेशोत्सवातील गर्दी विभागण्यासाठी 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत विशेष रेल्वे वाहतूक करण्याचे पत्रात नमूद आहे. मध्य रेल्वेच्या गणपती विशेष फेऱ्यांच्या कोचिंग नोटिफिकेशननुसार, सीएसएमटी- सावंतवाडी-सीएसएमटी, सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी, एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी, एलटीटी-मडगाव-एलटीटी, पुणे-रत्नागिरी-पुणे मार्गावर रेल्वेगाड्या चालवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यातील काही मार्गावर रोज तर काही मार्गावर साप्ताहिक अशा दोन्ही प्रकारात विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. या मार्गावर रेल्वेच्या एकूण दोनशे पन्नास फेऱ्या पार पडणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे हे अधिकृत नोटिफिकेशन अल्पावधीत समाज माध्यमांवर व्हायरल झाले. मध्य रेल्वेच्या चीफ पॅसेंजर ट्रांसपोर्टेशन मॅनेजर यांनी मध्य रेल्वेच्या चीफ कमर्शियल मॅनेजरला (पॅसेंजर मार्केटिंग) मेल पाठवत ‘मध्य रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाडी 2025 भाग-एक’ हे ‘कोचिंग नोटिफिकेशन क्रमांक 490/2025’ रद्द म्हणून समजावे, असे नमूद केले. विशेष म्हणजे अवघ्या तासाभरातच अर्थात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेने अधिकृत पत्र रद्द करून मागे घेण्यात आले.हेही वाचा मुंबईसह ‘या’ भागात अति मुसळधार पावसाचा इशारा मुंबईतील तलावाची पातळी 80% क्षमतेपर्यंत पोहोचली

गणपती विशेष गाड्यांची घोषणा पण तासाभरातच रद्द

गणेशोत्सवात (ganesh festival) कोकणातील प्रवास सुरक्षित आणि वेगवान व्हावा, यासाठी गणपती विशेष 250 रेल्वे फेऱ्यांची (special trains) घोषणा केली जाते. यंदाच्या उत्सवासाठी मध्य रेल्वेने गणेशोत्सव विशेष रेल्वे वाहतुकीची घोषणा सोमवारी सायंकाळी पाच वाजता केली. अवघ्या तासाभरातच ही घोषणा मागे (order cancelled) घेण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावली आहे. घोषणा मागे घेण्याचे नेमके कारण मध्य रेल्वेकडून (central railway) स्पष्ट करण्यात आलेले नाही.’मध्य रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाडी 2025 भाग-एक’ असे विशेष रेल्वे गाड्या चालवण्यासाठी ‘कोचिंग नोटिफिकेशन क्रमांक 490/2025’ मध्य रेल्वे मुख्यालयाने सोमवारी जाहीर केले. नोटिफिकेशन जाहीर करताना तीन जुलै रोजी कोकण रेल्वे विशेष रेल्वेगाडी व्यवहार्यता पत्र आणि एक जुलै रेल्वे मंडळ मंजूरी पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. गणेशोत्सवातील गर्दी विभागण्यासाठी 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत विशेष रेल्वे वाहतूक करण्याचे पत्रात नमूद आहे.मध्य रेल्वेच्या गणपती विशेष फेऱ्यांच्या कोचिंग नोटिफिकेशननुसार, सीएसएमटी- सावंतवाडी-सीएसएमटी, सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी, एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी, एलटीटी-मडगाव-एलटीटी, पुणे-रत्नागिरी-पुणे मार्गावर रेल्वेगाड्या चालवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यातील काही मार्गावर रोज तर काही मार्गावर साप्ताहिक अशा दोन्ही प्रकारात विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. या मार्गावर रेल्वेच्या एकूण दोनशे पन्नास फेऱ्या पार पडणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे हे अधिकृत नोटिफिकेशन अल्पावधीत समाज माध्यमांवर व्हायरल झाले.मध्य रेल्वेच्या चीफ पॅसेंजर ट्रांसपोर्टेशन मॅनेजर यांनी मध्य रेल्वेच्या चीफ कमर्शियल मॅनेजरला (पॅसेंजर मार्केटिंग) मेल पाठवत ‘मध्य रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाडी 2025 भाग-एक’ हे ‘कोचिंग नोटिफिकेशन क्रमांक 490/2025’ रद्द म्हणून समजावे, असे नमूद केले. विशेष म्हणजे अवघ्या तासाभरातच अर्थात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेने अधिकृत पत्र रद्द करून मागे घेण्यात आले.हेही वाचामुंबईसह ‘या’ भागात अति मुसळधार पावसाचा इशारामुंबईतील तलावाची पातळी 80% क्षमतेपर्यंत पोहोचली

Go to Source