लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत मोठा खुलासा झालाय. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. यासंदर्भातील पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून याचा खुलासा झाला आहे. या पोस्टचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.  शिबू लोणकर याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली त्यात त्याने सलमान खान, बाबा सिद्दीकी आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचं कनेक्शन सांगितलं. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख  पटल्याची माहिती समोर आली आहे.   काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच  पोस्टमध्ये केला आहे. 

Go to Source