स्वादिष्ट आणि पारंपारिक काजू मोदक; गणपती बाप्पांसाठी खास नैवेद्य

साहित्य- काजू – दोन वाट्या साखर – एक वाटी पाणी – अर्धा वाटी दूध पावडर -दोन टेबलस्पून तूप – अर्धा टीस्पून वेलची पावडर – अर्धा टीस्पून केशर दूधात भिजवलेले

स्वादिष्ट आणि पारंपारिक काजू मोदक; गणपती बाप्पांसाठी खास नैवेद्य

साहित्य-
काजू – दोन वाट्या
साखर – एक वाटी
पाणी – अर्धा वाटी
दूध पावडर -दोन टेबलस्पून
तूप – अर्धा टीस्पून
वेलची पावडर – अर्धा टीस्पून
केशर दूधात भिजवलेले

ALSO READ: चविष्ट अंजीर मोदक गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
कृती
सर्वात आधी काजू मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. पावडर खूप बारीक असावी, पण तेल सुटणार नाही याची काळजी घ्या.काजू पावडर एका बाऊलमध्ये बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून मध्यम आचेवर गरम करा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा आणि एक तारी पाक  तयार करा. साखरेचा पाक तयार झाल्यावर आच कमी करा आणि त्यात काजू पावडर हळूहळू टाका. सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळा. जर वापरत असाल तर यावेळी दूध पावडर, वेलची पावडर आणि भिजवलेले केशर घाला. अर्धा टीस्पून तूप घालून मिश्रण चांगले मिसळा. मिश्रण घट्ट होईल आणि पॅनपासून सुटायला लागेल. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे बनवा.मोदक साच्यात मिश्रण भरून त्याला मोदकाचा आकार द्या. जर साचा नसेल, तर हाताने मोदकाचा पारंपारिक आकार देऊ शकता.  तयार मोदक वरून थोडे केशर किंवा चांदीचा वर्ख लावू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवा चविष्ट बेसनाचे मोदक
Edited By- Dhanashri Naik