Ganesh Chaturthi 2025 स्वादिष्ट प्रसाद श्रीखंड, गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी

साहित्य- एक किलो दही ३/४ कप- पिठीसाखर अर्धा टीस्पून- वेलची पावडर पाच- केशराच्या काड्या कोमट दुधात भिजवलेल्या एक टेबलस्पून- चिरलेले पिस्ता आणि बदाम एक टेबलस्पून- गुलाबजल

Ganesh Chaturthi 2025 स्वादिष्ट प्रसाद श्रीखंड, गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी

साहित्य- 

एक किलो दही 

३/४ कप- पिठीसाखर 

अर्धा टीस्पून- वेलची पावडर

पाच- केशराच्या काड्या कोमट दुधात भिजवलेल्या 

एक टेबलस्पून- चिरलेले पिस्ता आणि बदाम 

एक टेबलस्पून- गुलाबजल 

ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 चविष्ट मोदक आणि स्वादिष्ट प्रसाद,गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी

कृती-

सर्वात आधी स्वच्छ मलमलच्या कापडात दही बांधून ५-६ तास किंवा रात्रभर लटकवून ठेवा, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल. यामुळे चक्का तयार होईल. आता 

चक्का गुळगुळीत होण्यासाठी चमच्याने किंवा मिक्सरने हलके फेटून घ्या. आता चक्का  मध्ये पिठीसाखर हळूहळू मिसळा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगले फेटा. तसेच साखरेचे प्रमाण स्वादानुसार कमी-जास्त करू शकता. तसेच भिजवलेल्या केशराच्या काड्या आणि वेलची पावडर मिसळा. गुलाबजल देखील घाला. मिश्रण गुळगुळीत आणि एकजीव होईपर्यंत फेटा. आता तयार श्रीखंड एका भांड्यात काढा आणि त्यावर चिरलेले पिस्ता आणि बदाम पसरवा. सर्व्ह करण्यापूर्वी १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा, जेणेकरून श्रीखंड थंड होईल आणि चव वाढेल. तयार श्रीखंड पुरी सोबत बाप्पाला नैवेद्यात ठेवा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवा चविष्ट बेसनाचे मोदक

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 गणपतीला प्रिय असलेल्या चविष्ट मोदकाच्या वेगवेगळ्या पाककृती