गणेशोत्सवात ‘या’ मार्गांवर रात्रभर धावणार बस

गणेशोत्सवातील दहा दिवस मुंबईत मोठी गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या सेवा वाढवण्यात येणार आहेत. दिवसा बेस्टच्या सेवा नियमित असतात. त्यामुळं वाहतुकीस अडचण येत नाही. मात्र, रात्रीच्या वेळेस गणेशभक्तांने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळं रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. गणेशभक्त आणि पर्यटकांसाठी 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवेच्या वाढीव फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.   कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक 4 मर्या. जे.जे रुग्णालय ते ओशिवरा आगार, 8 मर्या. जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर, ए – 21 डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार, ए -25 बॅकबे आगार ते कुर्ला आगार, ए-42 कमला नेहरू पार्क ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक, 44 वरळी व्हिलेज ते एस. यशवंते चौक (काळाचौकी), 66 इलेक्ट्रीक हाऊस ते सांताक्रूझ आगार, 69 डॉ. एस.पी.एम. चौक ते पी.टी. उद्यान, शिवडी, व सी -51 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते काळाकिल्ला आगार या बसमार्गावर रात्रीच्या जादा बस फेऱ्या धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.हेही वाचा गणेशोत्सवात कोकण मार्गावर अवजड वाहनांना बंदीठाणे : 158 गणेश मंडळे अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत
गणेशोत्सवात ‘या’ मार्गांवर रात्रभर धावणार बस


गणेशोत्सवातील दहा दिवस मुंबईत मोठी गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या सेवा वाढवण्यात येणार आहेत. दिवसा बेस्टच्या सेवा नियमित असतात. त्यामुळं वाहतुकीस अडचण येत नाही. मात्र, रात्रीच्या वेळेस गणेशभक्तांने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळं रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.गणेशभक्त आणि पर्यटकांसाठी 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवेच्या वाढीव फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.  कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक 4 मर्या. जे.जे रुग्णालय ते ओशिवरा आगार, 8 मर्या. जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर, ए – 21 डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार, ए -25 बॅकबे आगार ते कुर्ला आगार, ए-42 कमला नेहरू पार्क ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक, 44 वरळी व्हिलेज ते एस. यशवंते चौक (काळाचौकी), 66 इलेक्ट्रीक हाऊस ते सांताक्रूझ आगार, 69 डॉ. एस.पी.एम. चौक ते पी.टी. उद्यान, शिवडी, व सी -51 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते काळाकिल्ला आगार या बसमार्गावर रात्रीच्या जादा बस फेऱ्या धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.हेही वाचागणेशोत्सवात कोकण मार्गावर अवजड वाहनांना बंदी
ठाणे : 158 गणेश मंडळे अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत

Go to Source