गांधींच्या भाषेमुळे गुंतवणूकदार भयभीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘माओवादी’ भाषेमुळे भारतात गुंतवणूक करताना  कंपन्या 50 वेळा विचार करतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. राहुल गांधी खासगी संपत्तीचे सर्वेक्षण करुन तिचे पुनर्वाटप करण्याची स्वप्नाळू भाषा बोलत आहेत. जगात आतापर्यंत असे केठेही शक्य झालेले नाही. त्यांच्या या विचारांमुळे गुंतवणूकदार भयभीत झाले असून राहुल गांधी यांच्या विधानाचा फार […]

गांधींच्या भाषेमुळे गुंतवणूकदार भयभीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘माओवादी’ भाषेमुळे भारतात गुंतवणूक करताना  कंपन्या 50 वेळा विचार करतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. राहुल गांधी खासगी संपत्तीचे सर्वेक्षण करुन तिचे पुनर्वाटप करण्याची स्वप्नाळू भाषा बोलत आहेत. जगात आतापर्यंत असे केठेही शक्य झालेले नाही. त्यांच्या या विचारांमुळे गुंतवणूकदार भयभीत झाले असून राहुल गांधी यांच्या विधानाचा फार मोठा तोटा देशाला होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारसभेत ते रविवारी भाषण करीत होते. त्यांनी घराणेशाहीच्या संदर्भातही काँग्रेसवर जोरदार टीका केली. लोकसभेचे मतदारसंघ राहुल गांधी आपली वडिलोपार्जित मालमत्ता समजतात. हे खरे लोकशाही विरोधी वर्तन आहे. काँग्रेस लोकांची खासगी संपत्ती ताब्यात घेण्यासाठी नवे नवे मार्ग शोधत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
माओवाद पुनर्जिवीत होणार
काँग्रेस नेत्यांच्या भाषेमुळे हिंसक माओवाद पुनर्जिवीत होऊ शकतो. आमच्या सरकारने नक्षलींना चेचून काढले आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव नगण्य राहिला आहे. तथापि, आता काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या राजकीय पक्षांनी नक्षलींची भूमिका स्वत: साकारायावस प्रारंभ केला आहे. खंडणी गोळा करण्याचे काम आता हे पक्ष करीत आहेत. मात्र, या देशातली जनता सूज्ञ असून ती हे प्रयत्न फोल ठरविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी भाषणात व्यक्त केला.
त्यावेळी कोठे होतात ?
राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ स्वीकारला आहे. मी आपला पुत्र तुम्हाला सोपवित आहे, असे आवाहन सोनिया गांधींनी केले. पण आम्ही कोरोना काळात जेव्हा संकटात होतो, तेव्हा तुम्ही कोठे होतात, अशी विचारणा या गांधी कुटुंबाला रायबरेलीतील लोक करीत आहेत. यावरुन लोकांच्या मनात या कुटुंबासंबंधी किती नाराजी आहे, हे दिसून येते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.