पाऊस आणि निसर्ग….पर्यटकांना खुणावतोय गगनबावडा
रामचंद्र कुपले / गगनबावडा
गगनबावडा आणि अतीपाऊस हे जणू नातेच जुळले आहे. घोंगावणारा वारा, संततधार पाऊस,धुक्याची दुलई,उंचीवरुन कोसळण्राया धबधब्यांचे फेसाळणारे पाणी,अधूनमधून होणारे सूर्य दर्शन,डोंगररांगातील हिरवाई त्यामूळे गगनबावडा तालुक्यात सर्वत्र विलोभनीय दृश्य निर्माण झाले आहे.ऐतिहासिक, अध्यात्मिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या या तालुक्यात सदैव गर्दी असतेच पण अलीकडेण कधी उघडीप तर अधूनमधून कोसळण्राया मुसळधार पावसामुळे गगनबावडा तालुका पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना साद घालत आहे.
मे अखेरीस गगनबावडा तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.जूनपासून पून्हा सक्रीय झाला.दिड महिन्यांच्या कालावधीत येथील डोंगररांगा हिरव्यागार बनल्या आहेत.झाडे वेलींची वाढ,पठारी भागात वाढलेल्या गवतामूळे येथील डोंगर रांगा हिरवाईने नटल्या सजल्या आहेत.येथील नैसर्गिक स्रुष्टी सौंदर्याचा आविष्कार नजरेत भरणारा आहे.सर्वत्र धुक्याची दुलई पसरली आहे.करुळ व भूईबावडा घाटपरिसर,गगनबावडा,मर्द किल्ले गगनगड,लखमापूर,नरवेली,तळये, बोरबेट,मानबेट,वेसरफ,कोदे,खोकुर्ले या परिसरात जणू धुक्याची चादर पसरली आहे.घाट परिसरात तर तळ कोकणातून व्रायाच्या दिशेने येणारे धुके जणू आभाळात जात असल्याचा भास होत आहे.गेल्या काही दिवसांपासून गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे.धरण व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे.कुंभी धरण क्षेत्रात आज अखेरीस एकूण 1779 मिलीमीटर पाऊस झाला आहे.कोदे धरण क्षेत्रात 1983 मिलीमीटर पाऊस झाला आहे.कोदे,वेसरफ,अणदूर ही तिन्ही धरणे ओव्हर फ्लो झाली आहे. कुंभी धरण 45 टक्के भरले आहे.
येथील डोंगराळ भागामूळे पावसाळ्यात ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे येथील प्रमुख आकर्षण ठरते.अलीकडेच पावसाचा जोर वाढल्यामूळे येथील सौंदर्यात आणखी भर पडली आहे.धरण परिसरातील धबधबे कोसळत आहेत.हिरव्या गर्द झाडीतील कोसळण्राया धबधब्यांचे फेसाळणारे पाणी डोळ्यांचे पारणे फेडत आहे.बोरबेट,बावैली,तळये,लखमापूर,सैतवडे,शेळोशी जवळील सवतीचा कडा,असंडोली,कोदे इत्यादी ठिकाणी असंख्य धबधबे कोसळत आहेत.काही ठिकाणी गावातील युवकांनी मिळून त्या ठिकाणी पर्यंत पायवाट केली आहे. घनदाट झाडी,खोल दरी त्यामूळे काही ठिकाणच्या पाऊलवाटाही नामशेष झाल्याने हे विलोभनीय दृश्य फक्त डोळ्यांनीच पहावे लागते.भूईबावडा घाटमार्गातील प्रमुख रस्त्याकडेला असंख्य धबधबे कोसळत आहेत.तळकोकणात जाताना उजवीकडे कितीतरी धबधबे कोसळत आहेत.रिमझिम पाऊस,उंचावरुन कोसळण्राया धबधब्यांचा आवाज डावीकडील दरीत अधिकच घुमतो.गेल्या काही दिवसांपासून हे विलोभनीय दृश्य घाटमार्गात निर्माण झाले आहे.
करुळ घाटमार्ग सुरु होते गरजेचे.
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा गगनबावडा येथील करुळ व भूईबावडा घाट हा प्रमुख दुवा मानला जातो.करुळघाट दुरुस्ती कारणाने सहा महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद केला आहे.येथील स्थानिक व्यवसाय,उद्योग बंद पडले आहेत.घाट खुला होते लांबणीवर पडत आहे.येथील शुकशुकाट नुकसानकारक ठरू शकतो.घाटाचे काम गुणवत्तापूर्ण करुश हा मार्ग तात्काळ खुला होण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
संदिप वरेकर,व्यवस्थापक हॉटेल स्टोनार्क, गगनबावडा.
हॉटेल व्यवसाइकांना मंदी.
कळे ते गगनबावडा रस्त्याची चाळण झाली आहे.करुळ घाट बंद आहे.त्यामूळे गगनबावड्यात येण्रायांची संख्या कमालीची घटली आहे.येथील हॉटेल व्यावसाईकांना मोठा फटका बसला आहे.