गडकरी यांना भाजपने साईडलाईन केले – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या काल बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी कार्यकर्त्यांशी तसेच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली …

गडकरी यांना भाजपने साईडलाईन केले – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या काल बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी  कार्यकर्त्यांशी तसेच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे.

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

बारामतीच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे विविध मुद्यांवर बोलल्या. ‘ नितीन गडकरी चांगल काम करतात . ते भाजपमध्ये आहेत पण आम्हाला प्रेम देतात. ते दुसऱ्या पक्षात असले तरी जे चांगलंय त्याला चांगलं म्हटलं पाहिजे’ असं त्या म्हणाल्या. एवढंच नव्हे तर ‘गडकरींना साईडलाईन केलं’ असं मोठं विधानही त्यांनी केलं.  

 

अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या. शरद पवार गटाच्या नेत्यांनी हार न मानता पुन्हा पक्ष उभा करून लढण्याचा विश्वास दर्शवला. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Go to Source