आनंद अकादमी संघाकडे गडकरी चषक
12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा : अथर्व करडी मालिकावीर : सावंतवाडीचा 7 गड्यांनी पराभव
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित सुरेश गडकरी चषक आंतरकॅम्प 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद अकादमीने एम्स क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाचा 7 गड्यांनी पराभव करुन सुरेश गडकरी चषक पटकाविला. अथर्व करडीला मालिकावीर व सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात एम्स क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्व गडी बाद 104 धावा केल्या. त्यात अर्जुन सालीने 4 चौकारांसह 41 तर स्पर्शने 2 चौकारांसह 26 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे अथर्व करडीने 12 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 23.4 षटकात 3 गडी बाद 105 धावा करत सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अथर्व करडीने 5 चौकारांसह नाबाद 38 तर ओजस गडकरीने 2 चौकारांसह नाबाद 14 धावा केल्या. एम्सतर्फे द्विग्विजय देसाईने 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे, पुरस्कर्ते सुरेश गडकरी, दर्शन गडकरी, जमीर पटवेगार व आनंद करडी यांच्या हस्ते विजेत्या आनंद अकादमीला व उपविजेत्या एम्स क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाला चषक व प्रमाणपत्र तर सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील मालिकावीर व सामनावीर अथर्व करडी (आनंद अकादमी), उत्कृष्ट फलंदाज स्पर्श (सावंतवाडी), उत्कृष्ट गोलंदाज मयांक रावूल (सावंतवाडी) यांना देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Home महत्वाची बातमी आनंद अकादमी संघाकडे गडकरी चषक
आनंद अकादमी संघाकडे गडकरी चषक
12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा : अथर्व करडी मालिकावीर : सावंतवाडीचा 7 गड्यांनी पराभव बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित सुरेश गडकरी चषक आंतरकॅम्प 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद अकादमीने एम्स क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाचा 7 गड्यांनी पराभव करुन सुरेश गडकरी चषक पटकाविला. अथर्व करडीला मालिकावीर व सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भगवान महावीर मैदानावर […]