न्यूझीलंड संघाचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम

वृत्तसंस्था/वेलिंग्टन न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आगामी उन्हाळी मौसमातील भरगच्च क्रिकेट कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानुसार येत्या उन्हाळ्यात लंका आणि पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये वनडे मालिका खेळविल्या जातील. तसेच कसोटी मालिकाही आयोजित केल्या आहेत. चालु वर्षाअखेरीस आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप मालिकेतील न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिका खेळविली जाणार आहे. क्रिकेट न्यूझीलंडने आपल्या […]

न्यूझीलंड संघाचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम

वृत्तसंस्था/वेलिंग्टन
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आगामी उन्हाळी मौसमातील भरगच्च क्रिकेट कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानुसार येत्या उन्हाळ्यात लंका आणि पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये वनडे मालिका खेळविल्या जातील. तसेच कसोटी मालिकाही आयोजित केल्या आहेत. चालु वर्षाअखेरीस आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप मालिकेतील न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिका खेळविली जाणार आहे. क्रिकेट न्यूझीलंडने आपल्या संघाचा उन्हाळी मौसमातील क्रिकेट कार्यक्रम गुरूवारी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार नोव्हेंबर अखेरपर्यंत न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद भूषविणार आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट कार्यक्रमाला एप्रिलपासून प्रारंभ होईल, असे आयसीसीच्या सुत्राने सांगितलो.
28 नोव्हेंबरपासून ख्राईस्टचर्च येथे यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. ही मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत राहिल. त्यानंतर नव्या वर्षाच्या प्रारंभी न्यूझीलंड आणि लंका यांच्यात टी-20 आणि वनडे मालिका होणार आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरापासून पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील आठ सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिका सुरू होतील.तत्पूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात द. आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या तिरंगी मालिका होणार आहे. ही मालिका पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपूर्वीची राहिल. न्यूझीलंडचा संघ लंकेविरुध्द सहा सामन्यांची मालिका खेळेल. याच दरम्यान त्यांचे ऑस्ट्रेलियाबरोबरचे सामने राहतील. मार्च अखेरीस न्यूझीलंड संघाबरोबर पाकची वनडे मालिका सुरू होणार आहे
न्यूझीलंडचा क्रिकेट कार्यक्रम

इंग्लंड- न्यूझीलंड कसोटी मालिका (पहिली कसोटी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर-ख्राईस्टचर्च, दुसरी कसोटी 6 ते 10 डिसेंबर वेलिंग्टन, तिसरे कसोटी 14 ते 18 डिसेंबर-हॅमिल्टन).
लंका-न्यूझीलंड टी-20 मालिका (पहिला सामना 28 डिसेंबर-टॉरेंगा, दुसरा सामना 30 डिसेंबरला-टॉरेंगा, तिसरा सामना 2 जानेवारी 2025-नेल्सन)
लंका-न्यूझीलंड वनडे मालिका (पहिला सामना 5 जानेवारी वेलिंग्टन, दुसरा सामना 8 जानेवारी-हॅमिल्टन, तिसरा सामना 11 जानेवारी-ऑकलंड)
न्यूझीलंड-पाक टी-20 मालिका (पहिला सामना 16 मार्च- ख्राईस्टचर्च, दुसरा सामना 18 मार्च-ड्युनेडिन, तिसरा सामना 21 मार्च ऑकलंड, चौथा सामना 23 मार्च टॉरेंगा, पाचवा सामना 26 मार्च वेलिंग्टन)
न्यूझीलंड-पाक वनडे मालिका (पहिला सामना 29 मार्च-नेपियर, दुसरा सामना 2 एप्रिल-हॅमिल्टन, तिसरा सामना 5 एप्रिल-टॉरेंगा)