मित्रांसोबतचा हा खास दिवस अधिक गोड आणि आठवणीत राहील असा बनवण्यासाठी झटपट, टेस्टी आणि मित्रांनाआवडतील अशा काही खास फ्रेंडशिप डे स्पेशल रेसिपीज आज आपण पाहणार आहोत.

क्रिस्पी चीज गार्लिक ब्रेड (Crispy Cheese Garlic Bread)
गप्पांचा फड रंगला असताना खाण्यासाठी ही सगळ्यात परफेक्ट आणि सुपर हिट रेसिपी आहे.

साहित्य-
गार्लिक पाव / ब्रेड स्लाईस – १ पाकीट
बटर – ४-५ चमचे (रूम टेम्परेचर)
बारीक चिरलेला लसूण – २ चमचे
चिली फ्लेक्स आणि ओरिगाएनो – आवडीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर – १ चमचा
मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज – १ कप (किसलेले)

कृती-
सर्वात आधी एका वाटीत बटर, लसूण, कोथिंबीर, थोडे ओरिगाएनो आणि चिली फ्लेक्स एकत्र करून छान पेस्ट बनवा. ब्रेडच्या स्लाईसवर हे गार्लिक बटर व्यवस्थित लावा. वरून भरपूर किसलेले चीज आणि पुन्हा थोडे चिली फ्लेक्स-ओरिगानो भुरभुरा. पॅनवर मंद आचेवर झाकण ठेवून चीज वितळेपर्यंत (३-४ मिनिटे) किंवा ओव्हनमध्ये १८०°C वर ५ मिनिटे बेक करा. गरमागरम सर्व्ह करा!

इन्स्टंट कुरकुरीत पेरी-पेरी मखाना (Puri-Puri/Peri-Peri Makhana)
हसत-खेळत गप्पा मारताना आणि चित्रपट पाहताना कुरकुरीत स्नॅक्स हवेच!
 
साहित्य-
मखाने – २ कप
तूप किंवा बटर – १ ते २ चमचे
पेरी-पेरी मसाला – १ ते दीड चमचा
चाट मसाला – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार

कृत-
सर्वात आधी कढईत तूप किंवा बटर गरम करून मखाने मंद आचेवर ४-५ मिनिटे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. मखाने कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करा. गरम असतानाच त्यात पेरी-पेरी मसाला, चाट मसाला आणि थोडे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून मसाला मखान्याला छान चिकटेल.

नो-बेक चॉकलेट पीनट बटर बाईट्स (Chocolate Peanut Butter Bites)
मित्रांची गोड आठवण ताजी करण्यासाठी काहीतरी गोड तर बनलंच पाहिजे! ही रेसिपी न शिजवता अवघ्या १० मिनिटांत तयार होते.
 
साहित्य-
ओट्स – १ कप
पीनट बटर – ½ कप
मध किंवा गुळाची पावडर – ⅓ कप
डार्क चॉकलेट चिप्स किंवा किसलेले चॉकलेट – ½ कप
व्हॅनिला इसेन्स – ½ चमचा

कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाउलमध्ये ओट्स, पीनट बटर, मध, चॉकलेट चिप्स आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून मळून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे (लाडूंसारखे) तयार करा. हे गोळे १५-२० मिनिटे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा. बस, तुमची टेस्टी आणि हेल्दी चॉकलेट बाईट्स तयार आहेत!

कुलहड मॅंगो/चॉकलेट लस्सी (Cooler Drink)
ऑगस्टच्या वातावरणात गप्पा मारताना मस्त थंडगार ड्रिंक असेल तर काय मज्जा!
 
साहित्य-
घट्ट दही – २ कप
साखर – ४ चमचे (आवडीनुसार)
मॅंगो पल्प (आंब्याचा रस) किंवा चॉकलेट सिरप – ४-५ चमचे
वेलची पावडर – ½ चमचा
ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम) – सजवण्यासाठी

कृती-
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात दही, साखर, वेलची पावडर आणि बर्फाचे तुकडे घालून १ मिनिट फिरवून घ्या. त्यात मॅंगो पल्प किंवा चॉकलेट सिरप घालून पुन्हा एकदा ब्लेंड करा. काचेच्या ग्लासात किंवा मडक्यात (कुलहड) काढून वरून ड्रायफ्रूट्स आणि थोडे चॉकलेट सिरप/मॅंगो पीसेस घालून मित्रांना थंडगार सर्व्ह करा.

ALSO READ: Mango Shake Recipe झटपट बनवा सर्वांना आवडणारा मँगो शेक
टीप: या सर्व रेसिपीज खूप कमी वेळात आणि घरातील साध्या साहित्यात तयार होतात, ज्यामुळे तुमचा जास्त वेळ स्वयंपाकघरात न जाता मित्रांसोबत आनंदात घालवता येईल!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: Friendship Day Special Recipe चॉकलेट कोकोनट मिल्कशेक
Edited By- Dhanashri Naik