मित्रच ठरले वैरी, कल्याणला मित्रांनीच मित्राचा घेतला जीव
दारूच्या नशेत मित्रांनी मित्राचा जीव घेतला. कल्याणमधील चिंचपाडा इथे ही धक्कादायक घटना घडली. चौघे मित्र पार्टी करायला एकत्र आले होते. पण दारू कमी पडल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. याच वादात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. यानंतर इतर तिन मित्रांनी त्याला घर सोडण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यातील वाद आणखी चिघळला. रात्री उशीरा पार्टी सुरू असताना दारूच्या कमतरतेमुळे 25 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कार्तिक वायाळ या तरुणाला त्याच्याच तिघा मित्रांनी चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून फेकून दिल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 27 जून रोजी मध्यरात्री घडली होती, ज्यात पीडित, कार्तिक वायाळ आणि त्याचे तीन मित्र, नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांचा समावेश होता.हिंदुस्तान टाईम्सने पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, ते मद्यधुंद अवस्थेत असताना दारू कमी मिळाल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. अपमानास्पद वाटून कार्तिकने नीलेशच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. तिन्ही मित्रांना त्याचे घर सोडण्यास सांगितले. यातून त्यांच्यात तणाव वाढला. भांडणानंतर कार्तिक त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि झोपी गेला.यानंतर संतप्त झालेल्या निलेशने सागर आणि धीरजसह कार्तिकच्या खोलीत प्रवेश केला आणि त्याला बाल्कनीत ओढून आणले आणि खाली फेकून दिले. चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने कार्तिकला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिकच्या कुटुंबीयांनी पोलिसांना (police) याबाबत माहिती दिली असता. तीन मित्रांनी त्यांच्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. एक कथा रचली आणि दावा केला की कार्तिकच्या बाटलीच्या हल्ल्यात नीलेश जखमी झाला होता आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. कार्तिक बाल्कनीतून कसा पडला याबद्दल त्यांना काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, कार्तिकच्या कुटुंबाने पोलिसांनी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला. ज्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान घडलेल्या घटनांचा खरा क्रम उघड झाला, असे अहवालात म्हटले आहे.उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिसांनी आता नीलेश, सागर आणि धीरज यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी दिलेल्या जबाबातील काही गोष्टी संशयास्पद होत्या ज्या अधोरेखित करुन तपास केला असता, कार्तिकच्या मृत्यूबद्दल शंका निर्माण झाली आणि ही हत्या असल्याचे उघडकीस आले.हेही वाचामुंबई : झोपेत चालत असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झालापरळमध्ये वडाचे झाड अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू
Home महत्वाची बातमी मित्रच ठरले वैरी, कल्याणला मित्रांनीच मित्राचा घेतला जीव
मित्रच ठरले वैरी, कल्याणला मित्रांनीच मित्राचा घेतला जीव
दारूच्या नशेत मित्रांनी मित्राचा जीव घेतला. कल्याणमधील चिंचपाडा इथे ही धक्कादायक घटना घडली. चौघे मित्र पार्टी करायला एकत्र आले होते. पण दारू कमी पडल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. याच वादात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. यानंतर इतर तिन मित्रांनी त्याला घर सोडण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यातील वाद आणखी चिघळला.
रात्री उशीरा पार्टी सुरू असताना दारूच्या कमतरतेमुळे 25 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कार्तिक वायाळ या तरुणाला त्याच्याच तिघा मित्रांनी चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून फेकून दिल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना 27 जून रोजी मध्यरात्री घडली होती, ज्यात पीडित, कार्तिक वायाळ आणि त्याचे तीन मित्र, नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांचा समावेश होता.
हिंदुस्तान टाईम्सने पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, ते मद्यधुंद अवस्थेत असताना दारू कमी मिळाल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. अपमानास्पद वाटून कार्तिकने नीलेशच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. तिन्ही मित्रांना त्याचे घर सोडण्यास सांगितले. यातून त्यांच्यात तणाव वाढला. भांडणानंतर कार्तिक त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि झोपी गेला.
यानंतर संतप्त झालेल्या निलेशने सागर आणि धीरजसह कार्तिकच्या खोलीत प्रवेश केला आणि त्याला बाल्कनीत ओढून आणले आणि खाली फेकून दिले. चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने कार्तिकला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कार्तिकच्या कुटुंबीयांनी पोलिसांना (police) याबाबत माहिती दिली असता. तीन मित्रांनी त्यांच्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. एक कथा रचली आणि दावा केला की कार्तिकच्या बाटलीच्या हल्ल्यात नीलेश जखमी झाला होता आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते.
कार्तिक बाल्कनीतून कसा पडला याबद्दल त्यांना काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, कार्तिकच्या कुटुंबाने पोलिसांनी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला. ज्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान घडलेल्या घटनांचा खरा क्रम उघड झाला, असे अहवालात म्हटले आहे.
उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिसांनी आता नीलेश, सागर आणि धीरज यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी दिलेल्या जबाबातील काही गोष्टी संशयास्पद होत्या ज्या अधोरेखित करुन तपास केला असता, कार्तिकच्या मृत्यूबद्दल शंका निर्माण झाली आणि ही हत्या असल्याचे उघडकीस आले.हेही वाचा
मुंबई : झोपेत चालत असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला
परळमध्ये वडाचे झाड अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू