Fresh Raita उन्हाळ्यात या ३ प्रकारचे रायते स्वाद वाढवतील
Fresh Raita उन्हाळ्यात शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी थंडगार पदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. दह्यापासून बनवलेला रायता केवळ चविष्टच नाही तर तो शरीराला आतून थंड ठेवतो, त्वचा हायड्रेट ठेवतो आणि पचनक्रिया देखील सुधारतो. आज आम्ही तुमच्यासाठी ३ सोप्या, आरोग्यदायी आणि चविष्ट रायता रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता.
१. काकडी रायतं
साहित्य- थंड दही: १ कप, काकडी: २, काळं मीठ: १/४ टीस्पून, जीरेपूड: १/४ टीस्पून, हिरवी कोथिंबीर.
कृती: काकडी किसून घ्या आणि हलके पिळून घ्या. दही फेटून त्यात काकडी आणि सर्व मसाले घाला. थंड करून सर्व्ह करा.
२. पुदीना रायता
साहित्य- दही: १ कप, पुदिन्याची पेस्ट किंवा बारीक चिरलेला पुदिना: १ टेबलस्पून, काळे मीठ: चवीनुसार, जिरेपूड: चवीनुसार.
कृती: दही चांगले फेटून त्यात पुदिना आणि मसाले घाला. हे रायते शरीराला थंडावा देते आणि ताजेपणा जाणवतो.
ALSO READ: Kairi Chutney उन्हाळ्यात बनवा कैरीची चटणी रेसिपी
३. मिक्स फ्रूट रायता
साहित्य- दही: १ कप, कापलेले फळं जसे शेवफळ, केळी, डाळिंब, द्राक्ष: १/२ कप, काळीमिरी: एक चिमूटभर, मध आवडीनुसार.
कृती: फळांचे छोटे तुकडे करा आणि ते दह्यात मिसळा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही थोडे मध देखील घालू शकता. हे रायते पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि मुलांनाही ते खूप आवडते.