पूरग्रस्त भागातील महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप
मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त भागातील महिलांना वैयक्तिक पातळीवर पाच लाख सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयात माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की सक्षम फाउंडेशनतर्फे पूरग्रस्त महिलांना आणखी दहा हजार सॅनिटरी पॅड देण्यात येणार आहेत.सरकारकडून अन्न, वस्त्र आणि आर्थिक मदतमंत्री तटकरे म्हणाल्या की, पूरामुळे अनेक कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे. शासनाकडून अन्न, वस्त्र आणि आर्थिक मदत पुरवली जात आहे. मात्र महिलांच्या आरोग्याशी निगडित अशा सॅनिटरी नॅपकिनसारख्या मूलभूत गरजांचीही पूर्तता केली जात आहे. राज्यातील पूरग्रस्त आठ ते नऊ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन राखीव निधीतून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.धर्मादाय संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनसामाजिक संस्थांना आवाहन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्त भागांमध्ये महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्य व सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे करावा. पूरग्रस्त महिलांच्या सन्मान आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही पुढाकार निश्चितच त्या महिलांसाठी उपयुक्त आणि मदतकारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Home महत्वाची बातमी पूरग्रस्त भागातील महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप
पूरग्रस्त भागातील महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप
मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त भागातील महिलांना वैयक्तिक पातळीवर पाच लाख सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले आहेत.
तसेच मंत्रालयात माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की सक्षम फाउंडेशनतर्फे पूरग्रस्त महिलांना आणखी दहा हजार सॅनिटरी पॅड देण्यात येणार आहेत.
सरकारकडून अन्न, वस्त्र आणि आर्थिक मदत
मंत्री तटकरे म्हणाल्या की, पूरामुळे अनेक कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे. शासनाकडून अन्न, वस्त्र आणि आर्थिक मदत पुरवली जात आहे. मात्र महिलांच्या आरोग्याशी निगडित अशा सॅनिटरी नॅपकिनसारख्या मूलभूत गरजांचीही पूर्तता केली जात आहे.
राज्यातील पूरग्रस्त आठ ते नऊ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन राखीव निधीतून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
धर्मादाय संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन
सामाजिक संस्थांना आवाहन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्त भागांमध्ये महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्य व सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे करावा. पूरग्रस्त महिलांच्या सन्मान आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही पुढाकार निश्चितच त्या महिलांसाठी उपयुक्त आणि मदतकारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.