न्हावेलीत गव्यांच्या मुक्त संचार : शेतकरी मात्र चिंतेत

न्हावेली / वार्ताहर न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार पुन्हा आढळून आला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच याआधी मनसे विद्यार्थी माजी सावंतवाडी माजी शहराध्यक्ष अशिष सुभेदार यांच्या माध्यमातून आणि न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर तसेच चेतन पार्सेकर, नवनाथ पार्सेकर ,राज धवणं, अमोल पार्सेकर, प्रथमेश यांनी भेट घेऊन हे निदर्शनास आणून दिले होते. अलीकडेच […]

न्हावेलीत गव्यांच्या मुक्त संचार : शेतकरी मात्र चिंतेत

न्हावेली / वार्ताहर
न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार पुन्हा आढळून आला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच याआधी मनसे विद्यार्थी माजी सावंतवाडी माजी शहराध्यक्ष अशिष सुभेदार यांच्या माध्यमातून आणि न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर तसेच चेतन पार्सेकर, नवनाथ पार्सेकर ,राज धवणं, अमोल पार्सेकर, प्रथमेश यांनी भेट घेऊन हे निदर्शनास आणून दिले होते. अलीकडेच दत्ताराम परब (तिरोडकर) यांच्या मिरची लागवडीचे गव्याने नुकसान केल्याचे आढळले. मिरची केलेल्या लागवडीत अचानक गव्याने थैमान घातल्याने त्या ठिकाणी मिरची रोपांची नासधूस झाली आहे. सदर बाब तात्काळ लक्षात येताच त्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांच्या कानी घातले . तात्काळ त्यांनी त्याची दखल घेत वनपालांच्या कानावर घालत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली व स्वतः वनपाल आणि वनविभाग कर्मचारी हे तात्काळ त्या ठिकाणी दाखल होत पाहणी करून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. यावेळी सदर ग्रामस्थांनी आभार मानले.