लोककल्पतर्फे कणकुंबी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे सेंन्ट्राकेअर हॉस्पिटलच्या साहाय्याने कणकुंबी (ता. खानापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 54 हून अधिक गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी गावकऱ्यांना आरोग्य तपासणी, सल्लामसलत तसेच आरोग्य जनजागृतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या डॉ. लक्ष्मी कुलकर्णी, नर्सिंग कर्मचारी सना, अंजला, एम. बी. मोडगी यांनी वैद्यकीय सेवा दिल्या. लोककल्प […]

लोककल्पतर्फे कणकुंबी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे सेंन्ट्राकेअर हॉस्पिटलच्या साहाय्याने कणकुंबी (ता. खानापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 54 हून अधिक गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी गावकऱ्यांना आरोग्य तपासणी, सल्लामसलत तसेच आरोग्य जनजागृतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या डॉ. लक्ष्मी कुलकर्णी, नर्सिंग कर्मचारी सना, अंजला, एम. बी. मोडगी यांनी वैद्यकीय सेवा दिल्या. लोककल्प फाउंडेशनतर्फे अनंत गावडे, सुहासिनी पेडणेकर व संदीप पाटील यांनी समन्वयाचे काम पाहिले. हा उपक्रम लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून राबविला असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा उद्देश आहे. शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी लोककल्पचे आभार मानले.