Kolhapur : दिंडनेर्लीत कोल्ह्याचा धुमाकूळ, चार जण जखमी, सीपीआरमध्ये उपचार सुरु

                                     कोल्ह्याची दिंडनेर्लीत दहशत कोल्हापूर : दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास कोल्ह्याने चांगलाच धुमाकूळ घातला. शेतात काम करण्यासाठी निघालेल्या तसेच मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरीकांवर हल्ला केला. यामध्ये चारजण जखमी झाले असून, त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू […]

Kolhapur : दिंडनेर्लीत कोल्ह्याचा धुमाकूळ, चार जण जखमी, सीपीआरमध्ये उपचार सुरु

                                     कोल्ह्याची दिंडनेर्लीत दहशत
कोल्हापूर : दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास कोल्ह्याने चांगलाच धुमाकूळ घातला. शेतात काम करण्यासाठी निघालेल्या तसेच मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरीकांवर हल्ला केला. यामध्ये चारजण जखमी झाले असून, त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, दिंडनेर्ली येथे रविवारी पहाटेपासून एका कोल्ह्याने उच्छाद मांडला आहे. पहाटे शेतात कामासाठी गेलेले आणि मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या चौघांवर हल्ला करून त्याने चावा घेतला.
यात विक्रम दिनकर पाटील (वय ६०), आकाश शिंदे (३२), पांडुरंग बंडू बोटे (७०) आणि बेबीताई यशवंत शिंदे (५०, सर्व रा. दिंडनेर्ली) जखमी झाले. जखमींना चादर उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या कोल्ह्याची शोध मोहीम स्थानिकांकडून सुरू आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.