टेक्सासमध्ये पाच वाहनांच्या भीषण अपघातात चार भारतीय होरपळले
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मंगळवारी पाच वाहनांच्या भीषण अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक ने एसयूव्हीला मागून धडक दिली. धडक एवढी भीषण होती की वाहनाने पेट घेतला आणि त्यातील सर्व प्रवासी होरपळून मरण पावले.
पीडितांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. काही मृतांची ओळख पटली असून ते भारतीय होते. ते सर्व कारपुलिंग ॲपद्वारे जोडलेले होते. आणि बेंटोनविले, अर्कान्सास कडे निघाले असता त्यांचा वाहनाला अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पाच वाहनांचा समावेश आहे. एका वेगवान ट्रकने पीडितांच्या एसयूव्हीला पाठीमागून धडक दिली, त्यानंतर तिला आग लागली आणि सर्व प्रवासी जळून मरण पावले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए फिंगरप्रिंटिंग, दात आणि हाडांचे अवशेष वापरत आहेत.
Edited by – Priya Dixit