शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चार तास बैठक निष्फळ
हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन कायम : 390 एकर जमिनीची भरपाई देण्याची मागणी
बेळगाव : हिडकल जलाशयामध्ये जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढून रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले. तर यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये झालेली चार तासांची बैठक विफल ठरली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे. हिडकल जलाशयामध्ये जमीन गमावून 45 वर्षांचा कालावधी उलटला तरी 390 एकर जमिनीची भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे मास्तीहोळी गावासह परिसरातील इतर गावांतील शेतकऱ्यांनी क्लब रोड येथील पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर जनावरांसह धडक मोर्चा काढला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणे भाग पडले आहे. शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाटबंधारे खात्याचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन विचारपूस केली आहे.
या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली असून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे भरपाईपासून वंचित रहावे लागले आहे, असा आरोप केला. अनेक अधिकारी गेल्या 24 वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत असून त्यांच्याकडून अनेक गैरप्रकार केल्याचा आरोपही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला. डॅममधील माती व वाळू विकण्याचे गैरप्रकार चालविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर पाटबंधारे खात्याचे क्वॉर्टर्स खासगी लोकांना भाडेतत्त्वावर देण्यात येत आहेत. सरकारच्या नियमानुसार 150 रुपये भाडे आकारले जात आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून 10 ते 15 हजार रुपये भाडे आकारले जात आहे, असा थेट आरोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रकार पाटबंधारे खात्याच्या चौकटीत बसतो का? याबाबतचा अहवाल देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बेंगळूर येथील पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. रात्री 8 वाजेपर्यंत चर्चा करून कोणताच तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच होते.
Home महत्वाची बातमी शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चार तास बैठक निष्फळ
शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चार तास बैठक निष्फळ
हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन कायम : 390 एकर जमिनीची भरपाई देण्याची मागणी बेळगाव : हिडकल जलाशयामध्ये जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढून रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले. तर यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये झालेली चार तासांची बैठक विफल ठरली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे. हिडकल जलाशयामध्ये जमीन गमावून 45 वर्षांचा कालावधी […]
