मणिपूरमधील हल्ल्यात चार कमांडो जखमी

पोलिसांच्या बॅरेकवर रॉकेट लाँचरमधून गोळीबार वृत्तसंस्था/ इंफाळ मणिपूरच्या सीमावर्ती शहर मोरेहमध्ये शनिवारी रात्री उशिराने दहशतवाद्यांनी मणिपूर पोलीस कमांडोवर त्यांच्या बॅरेकमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात चार कमांडो जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांनी रॉकेट कंट्रोल ग्रेनेड (आरपीजी) देखील डागले. या हल्ल्यात पोलिसांच्या बॅरेकचे नुकसान झाले असून चार कमांडोना दुखापत झाली आहे. या […]

मणिपूरमधील हल्ल्यात चार कमांडो जखमी

पोलिसांच्या बॅरेकवर रॉकेट लाँचरमधून गोळीबार
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या सीमावर्ती शहर मोरेहमध्ये शनिवारी रात्री उशिराने दहशतवाद्यांनी मणिपूर पोलीस कमांडोवर त्यांच्या बॅरेकमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात चार कमांडो जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांनी रॉकेट कंट्रोल ग्रेनेड (आरपीजी) देखील डागले. या हल्ल्यात पोलिसांच्या बॅरेकचे नुकसान झाले असून चार कमांडोना दुखापत झाली आहे. या हल्ल्यानंतर सदर भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
डोंगराळ भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बॅरेकवर गोळीबार केला. हल्ल्यात जखमी झालेल्या चार कमांडोना जवळच्या आसाम रायफल्स ऊग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आसाम रायफल्सचे उच्च अधिकारी भारत-म्यानमार सीमेजवळील सीमावर्ती शहर मोरेहला रवाना झाले आहेत. शनिवारी दुपारपासून मोरेह परिसर हाय अलर्टवर आहे.
दहशतवाद्यांनी एकाच दिवसात दोनदा हल्ले केल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरुतवातीला इंफाळ-मोरेह महामार्गावर प्रवास करणाऱ्या मणिपूर कमांडोच्या युनिटवर दिवसाढवळ्या हल्ला करण्यात आला. त्यानंतर काही तासांनी रात्रीच्यावेळी मोरेह परिसरात कमांडोवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. या हल्ल्यासाठी रॉकेट लाँचरचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमी झालेल्या पोलीस कमांडोंपैकी एकाच्या कानाला स्फोटकांच्या स्फोटामुळे गंभीर इजा झाली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा जातीय हिंसाचार
गेल्या 7 महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. जवळपास महिनाभरापासून सुरू असलेली शांतता शनिवारी सकाळी मैतेई आणि कुकी समुदायातील संघर्षामुळे पुन्हा वाढली आहे. शनिवारच्या संघर्षात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या तणावापूर्वी 4 डिसेंबर रोजी तेंगनौपाल जिल्ह्यातील गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला होता.