खिळेगाव खूनप्रकरणी चौघे अटकेत
अद्याप दोघे फरार : काँग्रेस नेत्याच्या खुनामुळे खळबळ
वार्ताहर /बेळगाव
खिळेगाव (ता. अथणी) येथे 3 एप्रिल रोजी काँग्रेसचे नेते आण्णाप्पा निंबाळ यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी अथणी पोलिसांनी मिरजेत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान अद्याप दोन संशयित आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, 3 एप्रिल रोजी सायंकाळी खिळेगाव गावच्या बाहेर तलवारीने वार करून आण्णाप्पा निंबाळ यांचा खून केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. यासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी छापा टाकताना धागेदोरे शोधण्याचे काम सुरु केले. पोलिसांनी या खूनप्रकरणी विठ्ठल श्रवणकुमार पुजारी (वय 30 रा. पांडेगाव), शिवाजी लहू हजारे (वय 26), सुखदेव रघुनाथ हजारे (वय 26), संतोष आवजी होनमोरे (वय 24 रा. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, अथणी डीवायएसपी श्रीपाद जलदे, सीपीआय रवींद्र नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके करण्यात आली होती. सोमवारी मिरजेत सदर चौघांना पोलिसांनी अटक केली.
Home महत्वाची बातमी खिळेगाव खूनप्रकरणी चौघे अटकेत
खिळेगाव खूनप्रकरणी चौघे अटकेत
अद्याप दोघे फरार : काँग्रेस नेत्याच्या खुनामुळे खळबळ वार्ताहर /बेळगाव खिळेगाव (ता. अथणी) येथे 3 एप्रिल रोजी काँग्रेसचे नेते आण्णाप्पा निंबाळ यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी अथणी पोलिसांनी मिरजेत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान अद्याप दोन संशयित आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत सविस्तर […]