गावोणा चोडण येथे संरक्षक भिंतीची पायाभरणी
नवीन साकवाच्या बांधकामाचा आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याहस्ते शुभारंभ
वार्ताहर/जुने गोवे
मुसळधार पावसामुळे 9 जून रोजी कोसळलेल्या गावोणा चोडण येथील जोल्लो व्हाळाच्या संरक्षक भिंतीसह नवीन बांधकाम सुरू करण्यासाठी मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते आज पायाभरणी करण्यात आली. यावेळी मये जिल्हा पंचायतसदस्य शंकर चोडणकर, चोडणचे सरपंच रवींद्र किनळेकर, उपसरपंचा परपेच्युआ (वेल्डा) कुलासो, पंचायतसदस्य संजय कळंगुटकर, रमाकांत प्रियोळकर, पांडुरंग वायंगणकर, पंढरी वेर्णेकर, सिल्वानो पेरेरा, पुजा प्रसाद चोडणकर, प्रेमानंद म्हांबरे, सहाय्यक अभियंता श्री. देसाई, कनिष्ठ अभियंता अभिजित शणै, माजी सरपंच दिव्या उसापकर, माजी पंचायत सदस्य सावियो कुलासो व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला सरपंच रवींद्र किनळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अभियंता श्री. देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. आमदारांनी श्रीफळ वाढवून नवीन बांधकामाची सुरुवात केली. जमीन मालकांनी अशा प्रसंगी बांधकाम वेळेतच पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आपल्या भाषणातून केले. प्रेमानंद म्हांबरे, जिल्हा पंचायतसदस्य शंकर चोडणकर यांचीही कार्यक्रमात भाषणे झाली.आमदारांनी ताबडतोब लक्ष घालून नवीन बांधकाम करण्यासाठी सुरुवात केल्याबद्दल यावेळी उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सावियो कुलासो यांनी आभार मानले.
Home महत्वाची बातमी गावोणा चोडण येथे संरक्षक भिंतीची पायाभरणी
गावोणा चोडण येथे संरक्षक भिंतीची पायाभरणी
नवीन साकवाच्या बांधकामाचा आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याहस्ते शुभारंभ वार्ताहर/जुने गोवे मुसळधार पावसामुळे 9 जून रोजी कोसळलेल्या गावोणा चोडण येथील जोल्लो व्हाळाच्या संरक्षक भिंतीसह नवीन बांधकाम सुरू करण्यासाठी मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते आज पायाभरणी करण्यात आली. यावेळी मये जिल्हा पंचायतसदस्य शंकर चोडणकर, चोडणचे सरपंच रवींद्र किनळेकर, उपसरपंचा परपेच्युआ (वेल्डा) कुलासो, पंचायतसदस्य संजय कळंगुटकर, रमाकांत प्रियोळकर, पांडुरंग वायंगणकर, पंढरी वेर्णेकर, सिल्वानो […]
