चाळीस वर्षांची वाटचाल…
चार दशकांची वाटचाल करीत असताना आज आपल्याशी हितगुज साधायला अत्यानंद होत आहे. दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाची 105 वर्षांची अखंडित परंपरा आहे. 1984 मध्ये आम्ही या गोव्यात पाऊल ठेवलं. त्यावेळी एकच ध्येय आणि ध्यास होता जनतेशी प्रामाणिक राहून देशातील सर्वात छोट्या राज्यातील जनतेला न्याय देण्याचा. गेल्या 40 वर्षांत बदललेला गोवा आम्ही पाहिला. आज विकास कोणासाठी थांबत नाही. विकासांचा वेग गेल्या 5 वर्षांत झपाट्याने वाढलेला आहे. विकासबरोबरच अनेक घटक या राज्यात आले. वाहने वाढली, रस्ते अऊंद पडू लागले. गोव्यात हायवेंचे बांधकाम खूप छान पद्धतीने झाले. अद्याप काही भागात हायवेंच्या रस्त्यांचे बांधकाम होणे शिल्लक आहे. दोन वर्षांपूर्वी पणजीतून वास्को, पणजीतून मडगावला जाणे किमान दीड तासाचा प्रवास असायचा, आज या सरकारने नवे पूल उभारले. 6 पदरी रस्ते बांधले. आज मडगावहून पणजीत 25 ते 30 मिनिटांमध्ये पोहोचता येते. असे विविध बदल होत गेले व होत राहतील. बदलत्या काळानुऊप आपल्याला आपल्या जीवनातही थोडेफार बदल हे घडवून आणावेच लागतील. बदल हे आधुनिक जगात अपरिहार्यच आहेत.
1984 मध्ये प्रवेश करताना गोव्यासाठी गोव्यातील बातम्यांसाठी एक दोन पाने देत होतो. कालांतराने बदल करीत सर्वच्या सर्व पाने गोव्याची केली. संपूर्ण गोवा आवृत्तीचे प्रकाशनदेखील पर्वरीतून होऊ लागले. अगोदर कृष्ण धवल वर्तमानपत्र देत होतो, आज जास्तीत जास्त पाने आपण रंगीत देतो. वर्तमानपत्र चालविणे हे एक फार मोठे आव्हान असते हे पूर्वीपासून आजपर्यंत आम्ही अनुभवतो आहोत. मध्यंतरी कोविड महामारीचा काळ सर्वासाठीच गंभीर समस्यांचा होता. तरी देखील अनेक संकटांशी सामना करीत आम्ही अवघे काही दिवस डिजिटल पद्धतीने व त्यानंतर पुन्हा एकदा थेट वाचकांपर्यंत वर्तमानपत्र पोहोचविण्याचे काम केले. गेल्या चार दशकात अनेक गोष्टींना सामोरे गेलो. सत्याची बाजू मांडल्याने त्रासही सोसावा लागला परंतू. सत्य हे कटू असते आणि तरीही सत्य हे सत्यच असते. या धारणेवर आमचा विश्वास होता आणि आजही आहे. आपण सारे वाचक. दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियावर आपण सातत्याने प्रेम करीत राहिलात आपण सर्वांनीच दिलेल्या आशीर्वादाने आम्ही भारावून गेलो. वर्तमानपत्र चालविणे ही एक सेवा आहे आणि ती अखंडित गेली 40 वर्षे चालविणे हे फार कठिण काम होते. मात्र दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडिया गोवा आवृत्तीसाठी आमच्या अनेक पत्रकार मंडळींनी केलेले सहकार्य, संपूर्ण कर्मचारीवर्ग, छपाई यंत्रणेतील कर्मचारीवर्ग, वितरण, जाहिरात विभाग, आपल्यापर्यंत दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडिया पोहोचविणारे आमचे वृत्तपत्रे विक्रेते सहकारी त्यांच्या कष्टाविना दररोज आपल्याला भेटायला येणे शक्य झाले नसते. आज योग दूर असल्यामुळे आपल्याला भेटता आले नाही. परंतू आपल्याबरोबर भेटीचा कार्यक्रम अवश्य ठेवला पाहिजे. आपले आशीर्वाद हेच आमचे बळ आहे. जाहिरात हा जरी वर्तमानपत्राचा आर्थिक कणा असला तरी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य हे सतत पाठिशी राहू द्यावे.
गेल्या 40 वर्षांच्या दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडियाच्या गोवा आवृत्तीमधून आम्ही अनेक गौप्यस्फोट केले. विकासाच्या बातम्या दिल्या, गावागावातील छोटे छोटे कार्यक्रम, धार्मिक उत्सव, जत्रोत्सव, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम, उपक्रम विविध प्रकारच्या निवडणुका इत्यादींबाबत दररोज सविस्तर माहिती आपल्याकडे पोहोचविली. नेहमीच सत्याची बाजू धऊन राहिलो. कोणावर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न केले. काही घटनांमध्ये एकाला न्याय मिळाला तर दुसऱ्याला वाटते आपल्यावर अन्याय केला परंतु तसे धोरण स्वीकारलेले नव्हते, केवळ न्याय मिळावा हा उद्देश समोर ठेवताना कोणताही किंतु मनात ठेवलेला नव्हता. गेल्या 40 वर्षांत गोव्याने अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली त्या सर्वांचीच आम्ही साक्षीदार ठरलो, त्यावर वेळोवेळी भाष्य करताना मनात कोणतेही किल्मिष बाळगले नाही. एखादी व्यक्ती मग ती केवढीही मोठी असली तरी त्याची चूक दाखविणे हे आमचे कामच आहे. त्याचबरोबर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वर्तमानपत्र हे एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे थोडी फार न्याय देवतेची भूमिका बजावावी लागते. त्यातून अत्यंत निस्वार्थी आणि निपक्षपातीपणे आम्ही भूमिका बजावलेली आहे. हे करत असताना अनेक प्रसंगानाही तोंड द्यावे लागले. आज आधुनिक जगात आपल्याला सोशल मीडियाशीही दोन हात करीत वर्तमानपत्र जनतेच्या हाती देताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पुढील काळ हा आव्हांनांचा आहे. आजवर अनेक आव्हानांना आपण तोंड देत आलेलो आहोत. वृत्तपत्रसृष्टीसमोर जी काही आव्हाने आज उभी आहेत त्या आव्हांनाना आम्ही तोंड देऊच. शिवाय वृत्तपत्रे ही टिकली पाहिजेत. वाचकांचा प्रतिसाद हा आजही आम्हाला बहुसंख्येने मिळतोय, हा प्रतिसाद असाच मिळत राहो. आपले आशीर्वाद घेऊनच आपलं सर्वांच्या मनातलं वर्तमानपत्र म्हणजे दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडिया अशीच भक्कम वाटचाल करीत राहिल. आमच्या पखांना बळ म्हणजे आपले आशीर्वाद आहेत. त्याच शक्ती प्रेरणेतून आम्ही सातत्याने गगनभरारी मारीत रहाणार आहोत. आमचे असंख्य वाचक, स्नेही, आपुलकीने वागणारी आमची गोमंतकीय मंडळी, माता भगिनी तसेच आमचे सर्व कर्मचारी, भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे सर्व विक्रेते, जाहिरातदार व सर्व हितचिंतकांना याप्रसंगी शुभेच्छा देतो. तुमच्या आशीर्वादाचे बळ आम्हाला आजवर मिळाले असेच ते पुढेही राहिल अशी आशा बाळगतो.
आपला
किरण ठाकुर
चेअरमन व सल्लागार संपादक दैनिक भारत लाईव्ह न्यूज मीडिया
Home महत्वाची बातमी चाळीस वर्षांची वाटचाल…
चाळीस वर्षांची वाटचाल…
चार दशकांची वाटचाल करीत असताना आज आपल्याशी हितगुज साधायला अत्यानंद होत आहे. दैनिक तरुण भारतची 105 वर्षांची अखंडित परंपरा आहे. 1984 मध्ये आम्ही या गोव्यात पाऊल ठेवलं. त्यावेळी एकच ध्येय आणि ध्यास होता जनतेशी प्रामाणिक राहून देशातील सर्वात छोट्या राज्यातील जनतेला न्याय देण्याचा. गेल्या 40 वर्षांत बदललेला गोवा आम्ही पाहिला. आज विकास कोणासाठी थांबत नाही. […]
