नूतन पोलीस आयुक्तांनी स्वीकारली सूत्रे
बेळगाव : नूतन पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. गेल्या अठरा दिवसांपासून हे पद रिक्त होते. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर रिक्त असलेल्या पदावर 15 मार्च रोजी सरकारने इडा मार्टिन मार्बनिंग यांची नियुक्ती केली होती. सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी सूत्रे स्वीकारली. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी कार्यालयाच्या आवारात त्यांना सलामी देण्यात आली. सूत्रे स्वीकारल्यानंतर बैठक घेतली.
Home महत्वाची बातमी नूतन पोलीस आयुक्तांनी स्वीकारली सूत्रे
नूतन पोलीस आयुक्तांनी स्वीकारली सूत्रे
बेळगाव : नूतन पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. गेल्या अठरा दिवसांपासून हे पद रिक्त होते. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर रिक्त असलेल्या पदावर 15 मार्च रोजी सरकारने इडा मार्टिन मार्बनिंग […]