फॉर्म्युला ई शर्यत रद्द

वृत्तसंस्था/ हैद्राबाद हैद्राबादमध्ये 10 फेब्रुवारी रोजी होणारी दुसरी हैद्राबाद फॉर्म्युला ई मोटर शर्यत रद्द करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये नवे शासन आल्याने त्यांनी यापूर्वी केलेला करार मोडल्याने ही शर्यत रद्द करावी लागत असल्याचे आयोजकांनी सांगितले. हैद्राबादच्या नगर प्रशासन आणि ग्रामिण विकास विभाग खाते तेलंगणा शासनाच्या नियंत्रणाखाली असून 30 ऑक्टोबर 2023 रोजी यजमान शहराबरोबर झालेल्या करारातील अटी […]

फॉर्म्युला ई शर्यत रद्द

वृत्तसंस्था/ हैद्राबाद
हैद्राबादमध्ये 10 फेब्रुवारी रोजी होणारी दुसरी हैद्राबाद फॉर्म्युला ई मोटर शर्यत रद्द करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये नवे शासन आल्याने त्यांनी यापूर्वी केलेला करार मोडल्याने ही शर्यत रद्द करावी लागत असल्याचे आयोजकांनी सांगितले. हैद्राबादच्या नगर प्रशासन आणि ग्रामिण विकास विभाग खाते तेलंगणा शासनाच्या नियंत्रणाखाली असून 30 ऑक्टोबर 2023 रोजी यजमान शहराबरोबर झालेल्या करारातील अटी नव्या शासनाने धुडकाविल्याने ही शर्यत रद्द करण्यात आली आहे.