पश्चिम बंगालच्या माजी मंत्र्याचे निधन
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालचे माजी मंत्री बिस्वनाथ चौधरी यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्यावर कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात उपचार होत होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते. दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालुरघाट विधानसभा मतदारसंघातून ते आठ वेळा आमदार झाले होते. राज्यातील डाव्या आघाडीतील क्रांतीकारी समाजवादी पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. 1987 ते 2011 या कालावधीत ते राज्याचे समाजकल्याण आणि कारागृह विभागाचे मंत्री होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले. त्यांच्या निधनामुळे राज्यात अर्धा दिवस सुटीची घोषणाही ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केली आहे.
Home महत्वाची बातमी पश्चिम बंगालच्या माजी मंत्र्याचे निधन
पश्चिम बंगालच्या माजी मंत्र्याचे निधन
वृत्तसंस्था / कोलकाता पश्चिम बंगालचे माजी मंत्री बिस्वनाथ चौधरी यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्यावर कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात उपचार होत होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते. दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालुरघाट विधानसभा मतदारसंघातून ते आठ वेळा आमदार झाले होते. राज्यातील डाव्या आघाडीतील क्रांतीकारी समाजवादी पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. 1987 ते 2011 या […]