पाकचे माजी क्रिकेटपटू सईद अहमद कालवश
लाहोर : पाक संघाचे माजी कसोटी कर्णधार तसेच आक्रमक फलंदाज सईद अहमद यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. सईद अहमद यांनी विंडीज संघाविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. सईद अहमद यांनी 41 कसोटीत पाच शतके आणि 16 अर्धशतकांसह 2991 धावा जमविल्या. तसेच त्यांनी 22 गडी बाद केले. सईद अहमद हे पाक संघातील उपयुक्त फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जात असत. 1958 साली ब्रिजटाऊन बार्बाडोस येथे तत्कालिन बलाढ्या विंडीज संघाविरुद्ध सईद अहमद यांनी आपले कसोटी पदार्पण केले होते आणि ही कसोटी पाकने अनिर्णित राखली होती. सईद अहमद यांनी 20 व्या वर्षी कसोटी पदार्पण केले तर 1972-73 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी शेवटची कसोटी मेलबोर्न येथे खेळली होती.
Home महत्वाची बातमी पाकचे माजी क्रिकेटपटू सईद अहमद कालवश
पाकचे माजी क्रिकेटपटू सईद अहमद कालवश
लाहोर : पाक संघाचे माजी कसोटी कर्णधार तसेच आक्रमक फलंदाज सईद अहमद यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. सईद अहमद यांनी विंडीज संघाविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. सईद अहमद यांनी 41 कसोटीत पाच शतके आणि 16 अर्धशतकांसह 2991 धावा जमविल्या. तसेच त्यांनी 22 गडी बाद केले. सईद अहमद हे पाक संघातील उपयुक्त […]
