आयएनएसचे माजी अध्यक्ष नरेश मोहन यांचे निधन
नवी दिल्ली : इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे (आयएनएस) माजी अध्यक्ष आणि ख्यातनाम पत्रकार नरेश मोहन यांचे 16 मे 2024 या दिवशी निधन झाले आहे. सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष राकेश शर्मा यांनी मोहन यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. नरेश मोहन हे द्रष्टे आणि परखड पत्रकार होते. त्यांच्या नेतृत्वाचा आणि व्यापक दृष्टिकोनाचा प्रचंड लाभ संस्थेला झाला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण वृत्तपत्र उद्योगाची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दांमध्ये शर्मा यांनी मोहन यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी मोहन यांच्या शोकमग्न कुटुंबीयांनाही सांत्वनपर संदेश संस्थेच्यावतीने पाठविला आहे, अशी माहिती देण्यात आली.
Home महत्वाची बातमी आयएनएसचे माजी अध्यक्ष नरेश मोहन यांचे निधन
आयएनएसचे माजी अध्यक्ष नरेश मोहन यांचे निधन
नवी दिल्ली : इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे (आयएनएस) माजी अध्यक्ष आणि ख्यातनाम पत्रकार नरेश मोहन यांचे 16 मे 2024 या दिवशी निधन झाले आहे. सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष राकेश शर्मा यांनी मोहन यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. नरेश मोहन हे द्रष्टे आणि परखड पत्रकार होते. त्यांच्या नेतृत्वाचा आणि व्यापक दृष्टिकोनाचा प्रचंड लाभ संस्थेला झाला आहे. त्यांच्या […]