माजी नगरसेवक बाळू तारींसह नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद माजी नगरसेवक बाळू तारी यांसह मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान प्रभागातील उबाठा महिला उपशहर प्रमुख विद्या फर्नांडिस यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.आमदार निलेश […]

माजी नगरसेवक बाळू तारींसह नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद माजी नगरसेवक बाळू तारी यांसह मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान प्रभागातील उबाठा महिला उपशहर प्रमुख विद्या फर्नांडिस यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.आमदार निलेश आणि यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत सातत्याने पक्षप्रवेश होत आहेत. गेल्या काही दिवसात मालवण शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पक्षप्रवेशांचा धमाका सुरू आहे. रविवारी रात्री मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी प्रवेशकर्ते बाळू तारी, आपा मोरजकर, चंदू सरकारे, विनायक मोरजकर, संतोष पराडकर, राजू वाघ, यशवंत मेथर, यश तारी, योगेश मेस्त्री, राजेश वाघ, विशाल आचरेकर, करण कुबल, योगेंद्र कुबल, केदार पराडकर, सिद्धेश मलिये, सुशांत कोचरेकर, रोशन सावंत, हरेश गोवेकर, सूरज लोणे, जितेंद्र लोणे, शुभदा टिकम, निशा हुले, गौरांगी वाघ, चैताली सरकारे, उर्मिला हुले, निकिता जोशी, विद्या फर्नांडिस, वैष्णवी वाघ, शिल्पा परब, मनिषा हडकर, शुभदा मोरजकर, रीमा वाघ यांसह अन्य नागरिक प्रवेशकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी महेश कांदळगांवकर, उमेश नेरुरकर, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर, दिपक पाटकर, राजा गांवकर, बबन शिंदे, राजन सरमळकर, अंकित नेरुरकर, प्रभाग सात शिवसेना उमेदवार मेघा गावकर, नरेश हुले यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते