माजी नगरसेवक अमोल मानेंचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा बहुमान संपादन केलेल्या अमोल माने यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत माने यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत यापुढे आपण जनहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करणार असल्याचे माने यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख रणजित जाधव, उदय भोसले, किशोर घाटगे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
